कोल्हापूर - शिवरायांचे विचार अनेकांपर्यंत यापुढेही पोहोचावेत. यापुढेही त्यांनी या स्पर्धा सुरू ठेऊन शिवरायांचे विचार, शिवचरित्र सर्वांपर्यंत पोहोचावे यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant latest news) यांनी केले. कोल्हापुरात आयोजित किल्ले बांधणी स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभावेळी ते बोलत होते.
गेल्या अनेक वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार सर्वांच्या हृदयात समावले आहेत. पण आज सोशल मीडियाच्या विळख्यात अडकलेल्या नवीन पिढीने हेच विचार स्वतःपासून बाजूला करू नयेत, यासाठी कोल्हापूर युवासेनेच्यावतीने (Kophapur Yuvasena fort competition) संपूर्ण जिल्ह्यात गडकिल्ले बांधणी स्पर्धेचे आयोजन केले होते.
हेही वाचा-Tadoba National Park : खासदार सुप्रिया सुळेंनी शेअर केला काळ्या चित्त्याचा 'तो' व्हिडिओ
कॉलेजमध्ये जाऊन महाराजांच्या गडकिल्यांची माहिती द्यावी-
भविष्यात येणाऱ्या हजारो वर्षात छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार त्यांच्यामध्ये राहावेत यासाठी बालपणापासूनच मुलांच्या मनामध्ये महाराजांचे कार्याबद्दल प्रेम वाढावे म्हणून या स्पर्धा आयोजित केल्या होत्या. यावेळी शिक्षण मंत्री उदय सामंत (education minister Uday Samant on Shivaji Maharaj work) म्हणाले की, ही स्पर्धा युवासेनेने अखंडित ठेवावी. तसेच प्रत्येक शाळा आणि कॉलेजमध्ये जाऊन महाराजांच्या गडकिल्यांची माहिती द्यावी. याचबरोबर संपर्क प्रमुख अरुणभाई दुधवडकर म्हणाले की, किल्ले साकारलेल्या तरुणांच्या पाठीशी युवासेनेने अखंडित राहावे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंजित माने यांनी केले.
100 हून अधिक मंडळांचा सहभाग
जवळपास 100 हून अधिक किल्ले बनवणारे मंडळ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. यामध्ये शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, कसबा बावडा, कदम वाडी, आपटे नगर, बुधवार पेठ, मुक्त सैनिक अशा बरेच परिसरात मुलांनी किल्ले बनवले होते. काही मुलांनी तर चक्क छत्रपतींच्या काळातील वेषात माहिती सांगितली. कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन युवासेना जिल्हा आणि शहरने केले. यावेळी खासदार धर्यशील माने, जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, उपजिल्हा प्रमुख सुजित चव्हाण, मा. आमदार सुजित मिणचेकर, उल्लास दादा पाटील, मुरलीधर जाधव, आदी उपस्थित होते.
हेही वाचा-Cruise Drug Case : आर्यनकडे ड्रग्ज सापडले नाहीत, कट कारस्थानही रचले नाही - मुंबई उच्च न्यायालय
बक्षीस पात्र मंडळ पुढीलप्रमाणे-
प्रथम - महाकाली भजनी मंडळ, कुलाबा
द्वितीय - हिंदवी ग्रुप विचारे माळ, राजमाची
तृतीय - देखो ग्रुप मंगळवार पेठ, पन्हाळा
उत्तेजनार्थ - बाल मित्र वारीअर्स मुक्तसैनिक, पन्हाळा
उत्तेजनार्थ 2 - न्यू ग्रुप महालक्ष्मी कॉलनी आपटे नगर, शिवनेरी
बेस्ट परफॉर्मन्स पुढीलप्रमाणे -
- अभिदीप मित्र मंडळ, बावडा
- खंडोबा तालीम मंडळ, प्रतापगड
- विजेता तरुण मंडळ, कसबा बावडा
- दत्त तरुण मंडळ शिवाजी पेठ, राजगड
- साठमारी फ्रेंड्स सर्कल, मंगळवार पेठ, प्रचंडगड