ETV Bharat / state

Kolhapur Car Accident : कारचा भीषण अपघात; दोघा तरुणांचा जागीच मृत्यू - दोघा मित्रांवर काळाचा घाला

कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटी पाटगाव रोडवर कार ओढ्यात कोसळून दोघा तरुणांचा मृत्यू झाला आहे. आदिल कासम शेख आणि जावेद शेख अशी मृत तरुणांची नावे आहेत.

Kolhapur Car Accident
दोघा तरुणांचा जागीच मृत्यू
author img

By

Published : Jul 28, 2023, 9:10 PM IST

चालकाचा ताबा सुटला अन् चार चाकी थेट ओढ्यात कोसळली

कोल्हापूर : भरधाव कारवरील चालकाचा ताबा सुटला आणि कार रस्त्यालगत असलेल्या ओढ्यात कोसळली. जिल्ह्यातील गारगोटी-पाटगाव रोडवर दुपारी 3 च्या सुमारास हा अपघात घडला. भुदरगड तालुक्यातील तांबळे जवळील अनफ खुर्दचे दोघे तरुण या अपघातात जागीच ठार झाले. अपघातानंतर अनफ खुर्द गावावर शोककळा पसरली आहे.

चारचाकीवरील ताबा सुटला : भुदरगड तालुक्यातील गारगोटी-पाटगाव रस्त्यावर झालेल्या अपघातात आदिल कासम शेख आणि जहीर जावेद शेख हे दोन तरुण जागीच ठार झाले आहेत. तर साहिल मुबारक शेख हा तरुण जखमी झाला आहे. आज दुपारी हे तिघेजण आपल्या चारचाकीतून अनफ बुद्रुकच्या दिशेने निघाले होते. मात्र पुढील वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या नादात आदिल शेख याचा चारचाकीवरील ताबा सुटल्याने कार पलटी झाली. दासेवाडी येथील एका पुलावरून कार ओढ्यात कोसळली. या गाडीतून प्रवास करणाऱ्या तिघांपैकी दोघेजण जागीच ठार झाले. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी गाडीतील जखमींना बाहेर काढले. तर जखमींना गारगोटीतील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. मात्र उपचारापूर्वीच आदिल आणि जहीर यांचा मृत्यू झाला होता.

दोघा मित्रांवर काळाचा घाला : या अपघातात ठार झालेल्या आदिलने खानापूर येथील महाविद्यालयातून हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण पूर्ण केले होते. तर जहीर हा गारगोटी येथे नोकरी करत होता. झहीरच्या पश्चात आई-वडील आणि भाऊ असा परिवार आहे. तर आदिलच्या घरी आई-वडील, तीन बहिणी असा परिवार आहे.

अन तो ठरला अखेरचा कॉल : अपघातात ठार झालेला आदिल हा आज कोल्हापुरात आपली नवी कार नेण्यासाठी कुटुंबातील सदस्यांसह येणार होता. आदिलचा मित्र आरमान सय्यद याला अपघाताआधी पाच मिनिटे वेसरडे येथे फोन करून याबाबत त्याने सांगितले होते. तर नवीन कार घरात येणार असल्याने घरातील सर्वच सदस्य आनंदित होते. मात्र त्यांचा हा आनंद काही काळाचाच ठरला. अपघातात तरुण मुलाचा मृत्यू झाल्याने शेख कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

हेही वाचा -

  1. Container Accident Thane: मुंबई-नाशिक महामार्गावर कंटेनर चालकाचा ताबा सुटल्याने विचित्र अपघात; एक ठार
  2. Tamilnadu Truck Driver Drags Toll official : पुणे सातारा महामार्गावर जीवघेणा थरार, तामिळनाडूच्या ट्रक चालकाने कर्मचाऱ्याला नेले फरफटत
  3. Wall Collapse In Kolhapur : खासबाग मैदानाची संरक्षक भिंत कोसळून महिलेचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.