ETV Bharat / state

राधानगरी धरणाचे दोन दरवाजे पुन्हा उघडले; 4 हजार 256 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू - राधानगरी धरण

राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे पुन्हा उघडले आहेत. यामुळे पंचगंगा नदी पुन्हा धोक्याच्या पातळीकडे जाण्याची शक्यता आहे.

Two gates of Radhanagari dam opened
राधानगरी धरणाचे दोन दरवाजे पुन्हा उघडले; 4 हजार 256 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू
author img

By

Published : Aug 10, 2020, 9:41 PM IST

कोल्हापूर - राधानगरी धरणाच्या बंद झालेल्या दरवाजांपैकी दोन स्वयंचलित दरवाजे पुन्हा उघडले आहेत. 3 आणि 6 नंबरचे दरवाचे उघडले असून त्यातून 4 हजार 256 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू सुरू आहे. त्यामुळे धोक्याची पातळीखाली आलेली पंचगंगा नदी पुन्हा धोक्याच्या पातळीकडे जाण्याची शक्यता आहे.

राधानगरी धरणाचे दोन दरवाजे पुन्हा उघडले

गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला आहे. त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. मात्र, पावसाचा जोर ओसरल्यावर राधानगरी धरणाचे सर्वच दरवाजे पुन्हा बंद झाले. परिणामी पंचगंगा नदीची पाणी पातळी सुद्धा घटली आहे. मात्र आता धरणाचे दरवाजे पुन्हा उघडल्याने कोल्हापूरकरांची चिंता वाढली आहे.

जिल्ह्यात 24 तासात पडलेल्या आणि आतापर्यंत एकूण पडलेल्या पावसाची तालुका निहाय आकडेवारी :

हातकणंगले- 2.63 (358.38), शिरोळ- 0.14 (286.43), पन्हाळा- 7.43 (967.57), शाहूवाडी- 13.83 (1214.83), राधानगरी- 12.17 (1357.50), गगनबावडा-40 (3515), करवीर- 5 (736.27), कागल- 6 (952.71), गडहिंग्लज- 5.29 (650.57), भुदरगड-6.80 (1047.40), आजरा- 7.75 (1494.25), चंदगड- 8.17 (1504.33) पाऊस या वर्षी पडल्याची नोंद आहे.

जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे :

तुळशी 80.37 दलघमी, वारणा 834.95 दलघमी, दूधगंगा 620.84 दलघमी, कासारी 65.97 दलघमी, कडवी 62.18 दलघमी, कुंभी 62.11 दलघमी, पाटगाव 96.68 दलघमी, चिकोत्रा 29.65 दलघमी, चित्री 49.264 दलघमी, जंगमहट्टी 34.650 दलघमी, घटप्रभा 44.170 दलघमी, जांबरे 23.230 दलघमी, कोदे (ल पा) 6.060 दलघमी असा आहे.

तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे :

राजाराम 41.4 फूट, सुर्वे 39.10 फूट, रुई 70.9 फूट, इचलकरंजी 66.3 फूट, तेरवाड 58 फूट, शिरोळ 53.6 फूट, नृसिंहवाडी 52.6 फूट, राजापूर 41 फूट तर नजीकच्या सांगली 18 फूट व अंकली 25.7 फूट अशी आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.