ETV Bharat / state

MLA Chandrakant Jadhav Death : कोल्हापुरातील आमदार चंद्रकांत जाधव यांचे हैदराबादेत निधन - आमदार चंद्रकांत जाधव यांचे निधन

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत जाधव (अण्णा) यांचे दुःखद निधन झाले. हैदराबाद येथे त्यांचे निधन झाल्याची माहिती आहे. दुपारी एक वाजताच्या सुमारास त्यांचे पार्थिव कोल्हापुरात दाखल होणार आहे. सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...

MLA Chandrakant Jadhav
आमदार चंद्रकांत जाधव
author img

By

Published : Dec 2, 2021, 8:22 AM IST

Updated : Dec 2, 2021, 11:58 AM IST

कोल्हापूर - कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत जाधव ( MLA Chandrakant Jadhav ) यांचे आज सकाळी दुःखद निधन झाले. हैदराबाद येथे उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती नव्हती. मात्र आज गुरुवारी त्यांची प्राणज्योत मालवली. आज दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास त्यांचे पार्थिव कोल्हापुरात दाखल होणार आहे.

सर्वांचे लाडके अशी ओळख -

आमदार चंद्रकांत जाधव हे गेल्या अनेक वर्षांपासून उद्योग क्षेत्रात काम करत होते. मात्र 2019 साली त्यांनी काँग्रेसकडून कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातुन निवडणूक लढवली. यामध्ये शिवसेनेच्या राजेश क्षीरसागर ( Rajesh Kshirsagar ) यांचा पराभव करत पाहिल्यांदाच ते आमदार झाले. चंद्रकांत जाधव यांचा शहरातील अनेक तालीम मंडळांशी चांगले संबंध होते. अल्पावधीतच त्यांनी अनेक कामांच्या माध्यमातून त्यांनी लोकांचा विश्वास प्राप्त केला होता. मात्र अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना हैदराबाद येथील रुग्णालयात उपचार सुरू केले होते. या दरम्यानच त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, चंद्रकांत जाधव यांना यापूर्वी दोन वेळा कोरोनाची ( Covid -19 ) लागण झाली होती. त्यामधून ते ठणठणीत बरे सुद्धा झाले होते. मात्र पुन्हा त्रास सुरू झाल्याने रुग्णालयात उपचार सुरू असताना वयाच्या 57 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या जाण्याने शहरासह जिल्ह्यातुन हळहळ व्यक्त केली जात आहे.

  • उत्तर कोल्हापूर मतदारसंघाचे काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनाचे वृत्त धक्कादायक आहे. त्यांच्या रूपात सर्वसामान्य नागरिक आणि व्यावसायिक - उद्योजकांच्या समस्या सोडविण्यासाठी कायम प्रयत्नशील, आग्रही राहणारा लोकप्रतिनिधी हरपला आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. pic.twitter.com/kCdnWRSaeF

    — Ashok Chavan (@AshokChavanINC) December 2, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक -

मुळचे खेळाडू असलेल्या आमदार जाधव यांनी खिलाडूवृत्तीने आपली वाटचाल केली. त्यामध्ये उद्योजकता आणि राजकारण यांचा समतोल सांभाळला. विधिमंडळातील एका उमद्या सहकाऱ्यांचे असे अवेळी निघून जाणे क्लेशदायक आहे. जाधव यांच्या कुटुंबियांना हा आघात सहन करण्याची ताकद मिळावी, ही ईश्वरचरणी प्रार्थना. आमदार चंद्रकांत जाधव यांना भावपूर्ण श्रद्धांजली, अशा भावना व्यक्त करत मुख्यमंत्र्यांनी चंद्रकांत जाधव यांना श्रध्दांजली वाहिली.

Last Updated : Dec 2, 2021, 11:58 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.