ETV Bharat / state

मोठा दिलासा : कोल्हापुरात आणखी 13 रुग्णांची कोरोनावर मात

मंगळवारी दिवसभरात 74 रुग्ण बरे झाले होते. तर आज दुपारी 12 वाजता प्राप्त अहवालानुसार आणखी 13 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने रुग्ण बरे होताना दिसत असल्याचे दिलासादायक चित्र कोल्हापुरात पाहायला मिळत आहे.

कोल्हापूर कोरोना
कोल्हापूर कोरोना
author img

By

Published : Jun 3, 2020, 3:17 PM IST

कोल्हापूर - जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण सापडण्याचे प्रमाण काहीसे घटल्याचे दिसत आहे. रात्रीपासून एकही नवा रुग्ण वाढलेला नाही. शिवाय कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याची संख्या सुद्धा वाढत चालली आहे.

मंगळवारी दिवसभरात 74 रुग्ण बरे झाले होते. तर आज दुपारी 12 वाजता प्राप्त अहवालानुसार आणखी 13 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने रुग्ण बरे होताना दिसत असल्याचे दिलासादायक चित्र कोल्हापुरात पाहायला मिळत आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत एकूण बाधित रुग्णांची संख्या 630 वर पोहोचली आहे. मात्र, यातील 282 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून ते आपल्या घरी गेले आहेत. तर 6 जणांचा मृत्यू झाला आहे.

सद्यपरिस्थित जिल्ह्यात एकूण 342 अॅक्टिव रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. रात्रीपासून एकूण 74 जणांच्या स्वॅबचे अहवाल सीपीआर प्रशासनाला प्राप्त झाले आहेत. त्यातील 73 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर एक फॉलोअप अहवाल असल्याचे सीपीआरकडून सांगण्यात आले आहे.

तालुकानिहाय कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे :

आजरा : 50
भुदरगड : 65
चंदगड : 71
गडहिंग्लज : 67
गगनबावडा : 6
हातकणंगले : 6
कागल : 53
करवीर : 12
पन्हाळा : 24
राधानगरी : 63
शाहूवाडी : 167
शिरोळ : 7
नगरपालिका क्षेत्र : 11
महानगरपालिका क्षेत्र : 21
इतर : 7
एकूण : 630

डिस्चार्ज : 282
मृत्यू : 6
ऍक्टिव्ह : 342

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.