ETV Bharat / state

'व्हेंटिलेटर' धूळखात पडून : मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची संभाजी ब्रिगेडची मागणी - कोल्हापूर व्हेंटिलेटर बातमी

शिवाजी विद्यापीठात डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी केअर सेंटर येथे जुलै महिन्यात दोन व्हेंटिलेटर दाखल झाले. पण, ते अद्याप कार्यान्वित करण्यात न आल्याने संभाजी ब्रिगेडकडून संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

बंद अवस्थेतील व्हेंटिलेटर
बंद अवस्थेतील व्हेंटिलेटर
author img

By

Published : Sep 28, 2020, 3:53 PM IST

कोल्हापूर - कोल्हापुरात तीन महिन्यांपासून शिवाजी विद्यापीठाच्या डिओटी सेंटर येथे दोन व्हेंटिलेटर बंद अवस्थेतच आहेत. त्यामुळे अनेक रुग्णांना जीव गमावावा लागला आहे. याबाबत संबंधित अधिकार्‍यांची चौकशी करून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे.

मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात संभाजी ब्रिगेडची मागणी

शिवाजी विद्यापीठात डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी केअर सेंटर येथे जुलै महिन्यात दोन व्हेंटिलेटर दाखल झाले. पण, आरोग्य विभागाने या दोन्ही वेंटिलेटरचा वापर अद्यापही सुरू केलेला नाही. ही बाब संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात येताच संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष रुपेश पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी डीओटी सेंटरवर धडक मारली. डीओटीमध्ये दोन व्हेंटिलेटर बंद अवस्थेत आढळले. कर्तव्यावरील वैद्यकीय अधिकाऱ्यांना धारेवर धरताच त्यांनी वरिष्ठांकडे बोट दाखवले. डीओटी सेंटरचे प्रमुख डॉ. पावरा यांना फोन करून याबाबत विचारणा केली असता, त्यांनी हे दोन व्हेंटिलेटर जुलैमध्ये आले असून लवकरच सुरू करू, असे सांगितले.

त्यानंतर कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी यांना फोन करून हे व्हेंटिलेटर तीन महिन्यांपासून येथे पडून का आहेत? याबाबत विचारणा केली. त्यानंतर त्यांनी हे दोन व्हेंटिलेटर कोविड केअर सेंटर असल्यामुळे वापरता येत नाहीत, असे सांगितले. कोविड केअर सेंटरमध्ये व्हेंटिलेटर लावण्याची परवानगी नाही तर, हे दोन व्हेंटिलेटर येथे का दिले, असा सवालही यावेळी ब्रिगेडकडून उपस्थित करण्यात आला.

हेही वाचा - कोल्हापूर ट्रॉमा केअर आग : आजारी पित्याचा मृत्यू झाल्याचा मुलाचा आरोप, रुग्णालयाचा नकार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.