ETV Bharat / state

Shiv Sena vs Shinde Group : आमदारकी पणाला लावून हिंदुत्वासाठी लढणाऱ्यांच्या बदनामीचे सेनेकडून सत्र सुरू - केसरकर

author img

By

Published : Oct 2, 2022, 1:12 PM IST

शिवसेनेच्या आणि शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यावरून सध्या टीझर वॉर सुरू आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर टीका ही सुरू आहे. मात्र बाळासाहेबांनी हिंदु विचाराचे सोनं लुटण्यासाठी दसरा मेळावा घेण्यास सुरुवात केली. याच्यामधून वेगवेगळे विचार हे बाळासाहेबांनी संपूर्ण महाराष्ट्राला दिले. बाळासाहेबांचे विचार हे प्रखर हिंदुत्वाचे विचार होते आणि हिंदुत्वाचं सोनं ते शिवाजी पार्क म्हणजेच शिवतीर्थवरती लुटत होते. सध्या उद्धव ठाकरेकडून काँग्रेस असेल राष्ट्रवादी पक्षाचे विचार लुटले जात असून काँग्रेस, राष्ट्रवादी शिवसेनेचा विचार त्याच्यामध्ये काहीही साधर्म नाहीये आणि अशा जर विचारांचे सोनं तुम्ही लुटायला गेला तर त्याला शिवसेना म्हणता येणार ( Deepak Kesarkar criticize Shiv Sena  ) नाही. अशी टीका शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केली आहे.

Shiv Sena vs Shinde Group
दीपक केसरकर

कोल्हापूर : शिवसेनेच्या आणि शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यावरून सध्या टीझर वॉर सुरू ( Shiv Sena and Shinde Teaser war ) आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर टीका ही सुरू आहे. मात्र बाळासाहेबांनी हिंदु विचाराचे सोनं लुटण्यासाठी दसरा मेळावा घेण्यास सुरुवात केली. याच्यामधून वेगवेगळे विचार हे बाळासाहेबांनी संपूर्ण महाराष्ट्राला दिले. बाळासाहेबांचे विचार हे प्रखर हिंदुत्वाचे विचार होते आणि हिंदुत्वाचं सोनं ते शिवाजी पार्क म्हणजेच शिवतीर्थवरती लुटत होते. सध्या उद्धव ठाकरेकडून काँग्रेस असेल राष्ट्रवादी पक्षाचे विचार लुटले जात असून काँग्रेस, राष्ट्रवादी शिवसेनेचा विचार त्याच्यामध्ये काहीही साधर्म नाहीये आणि अशा जर विचारांचे सोनं तुम्ही लुटायला गेला तर त्याला शिवसेना म्हणता येणार ( Deepak Kesarkar criticize Shiv Sena ) नाही. अशी टीका शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केली आहे.

दीपक केसरकर

हिंदुत्ववादाचे विचार लुटायचे अधिकार शिंदेंना : बाळासाहेब ठाकरे यांचे विचार हे प्रखर हिंदुत्वाचे ( Balasaheb Thackeray thoughts are strongly Hindutva ) होते. आणि हिंदुत्ववादाचे विचार लुटायचे असेल तर त्याचा अधिकार आज महाराष्ट्रात केवळ एका व्यक्तीला आहे आणि ते म्हणजे एकनाथ शिंदे. जे आमदार आणि खासदार सत्तेतून बाहेर पडले ते दुसऱ्या पक्षात गेले असते तर त्यांना हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाच्या समोर जावे लागले नसते मात्र ज्या आमदारांनी आपली आमदारकी पणाला लावून हिंदुत्वासाठी लढले त्यांच्या बदनामीसाठी एक सत्र महाराष्ट्रामध्ये सुरू असल्याची टीका त्यांनी नाव न घेता आदित्य ठाकरे यांच्यावर ( Deepak Kesarkar criticize Aditya Thackeray ) केली आहे. ही युती बाळासाहेब ठाकरे आणि अटल बिहारी वाजपेयी यांनी केलेली युती असून ही युती कोणाला ही तोडण्याचा अधिकार कोणाला नाही. आम्ही कोणाशी तुलना करत नाही. मात्र आमचा मेळावा हा हिंदुत्वाच्या विचारांचा मेळावा असेल असे केसरकर म्हणाले आहेत.

ग्राउंडवर उतरून काम करणारे लोक : विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी आज शिंदे गटांच्या आमदारांवर टीका केली शिंदे गटातील आमदारांना मस्ती आली आहे. असे म्हणत त्यांनी शिंदे गटांच्या आमदारांवर टीका केली सोबतच ठाकरे गटातील चंद्रकांत खैरे यांनीही शिंदे गटाच्या आमदारांवर टीका केली. दरम्यान याबाबत बोलताना दीपक केसरकर म्हणाले, मला कोणाबद्दलही बोलायचं नाही खैरे साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत. मात्र ज्या पद्धतीने बोलले जातात ती पद्धत चुकीची आहे. शिंदे गटाचा मुख्य प्रवक्ता म्हणून ही जबाबदारी माझ्याकडे दिली आहे. मात्र काही कामांमुळे कधीकाळी आमदारांकडून चुकीच्या स्टेटमेंट गेल्या तर त्याची आम्ही दिलगिरी ही व्यक्त केली आहे. एवढा मनाचा मोठेपणा आमच्या जवळ आहे. असे मस्ती कोणालाही आली नाही, असे केसरकर म्हणाले आहेत. आम्ही ग्राउंडवर उतरून काम करणारी लोक आहोत. रात्रंदिवस आम्ही काम करत असून लोकांपर्यंत पोहोचण्याचे काम आमचे आमदार खासदार करत आहेत. एकनाथ शिंदे हे देखील रात्रंदिवस फिरत आहेत. मात्र जे अगोदर फिरत नव्हते तेही आता आमच्यावर टीका करू लागले आहेत. महाराष्ट्राचे गतवैभव हे आम्ही महाराष्ट्राला मिळवून देणार असेही केसरकर म्हणाले आहेत.

संधी होती तेव्हा काम केलं का : शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याच्या पार्किंगसाठी विद्यापीठाची जागा दिल्याने युवासेनेने आक्षेप घेतला असून ही जागा राजकीय दबावापोटी दिली असल्याचे टिका युवा सेनेकडून करण्यात आली आहे. मात्र प्रत्येक गोष्टीवर टीका करायची आणि टीका केल्यानंतर लोकांची दिशाभूल करायची ही पद्धत सध्या सुरू असून उद्या जर मेळावासाठी येणाऱ्या गाड्यांनी अख्या मुंबईचा ट्रॅफिक जाम झालं तर ते योग्य आहे का? जर पार्किंग योग्य ठिकाणी झालं तर मग काय बिघडल. प्रत्येक गोष्टीला टीका करणारे कधी काम करत नसतात आणि काम करणारे कधी टीका करत नसल हे आपण नेहमी लक्षात ठेवा आज महाराष्ट्रामध्ये टीका करत कोण फिरत आहे हे आपल्याला माहिती आहे. ज्यांना तेव्हा संधी होती त्यांनी काम केलं का याचा विचार महाराष्ट्राने करावा आणि योग्य तो निर्णय घ्यावा असा टोला ही केसरकर यांनी आदित्य ठाकरेंना लगावला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.