कोल्हापूर : आगारात ऑइल डेपोचे क्लर्क स्वप्निल पाटील यांच्याकडून ऑइल डेपोची चावी हरवल्याच्या कारणावरून आगार व्यवस्थापकांनी पाटील यांना निलंबनाची नोटीस दिली. मात्र, स्वप्नील पाटील यांनी अधिकाऱ्यांची भेट घेऊन निलंबनाची कारवाई करू नये यासाठी विनंती केली. पुन्हा शुक्रवारी पगार व्यवस्थापकांनी स्वप्निल पाटील यांना निलंबनाची नोटीस दिली. या विरोधात सर्व कर्मचारी एकवटले. आगार व्यवस्थापनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत व्यवस्थापना विरोधात संताप व्यक्त केला. केलेले निलंबन तात्काळ रद्द करावे, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली.
काय आहे सत्यस्थिती कोल्हापुरात एकूण 650 एसटी असून सद्यस्थितीत 600 एसटी बसेस रस्त्यावर धावत आहेत. यातील काही बसेसची अवस्था मात्र दयनीय आहे. येथे सर्वच एसटीची दररोज तपासणी होत असते. तपासणी केल्याशिवाय एकही एसटी डेपोमधून बाहेर पडत नाही. यामध्ये प्रामुख्याने ब्रेकची तपासणी नियमित केली जाते. शिवाय टायर आणि इंजिनची काही कामे असतील तर संबंधित ड्रायव्हरला विचारून तशी कामे केली जातात; मात्र सध्या नियोजनाचा अभाव असल्याने सकाळी 7 वाजता आगारातून सुटणारी एसटी बस साडेनऊच्या दरम्यान चालकाच्या ताब्यात मिळते. यानंतर तपासणी करण्यामध्ये वेळ जात असल्याने याचा नाहक त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे, अशा काही तक्रारी चालक आणि वाहकांनी केल्या.
वादाचा प्रवाशांना फटका: कोल्हापूर आगाराचे व्यवस्थापक अमर निकम यांनी ही निलंबनाची कारवाई केली; मात्र आगार व्यवस्थापन आणि चालक, वाहक यांच्यासह आगारातील कर्मचारी यांचे प्रशासनाशी फारसे सख्ख नसल्याचे हे चित्र पाहायला मिळाले. निलंबनाची कारवाई केल्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्र येत काम बंद आंदोलन केले. याचा फटका प्रवाशांना सहन करावा लागला. कोकण सह कर्नाटकात जाणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले. रात्री उशिरापर्यंत या आंदोलनातून मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू होता.
हेही वाचा: