कोल्हापूर - दरवर्षी लाखोंच्या संख्येने शिवभक्त राज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडवर येत असतात. मात्र, यंदा सलग दुसऱ्या वर्षी केवळ मोजक्याच शिवभक्तांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे. त्यासाठी कोल्हापूरहून निवडक मावळ्यांचा चमू रायगडकडे रवाना झाला त्याला संयोगीताराजे छत्रपती यांनी निरोप दिला.
15 वर्षांपासून रायगडावर राज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन
युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वात गेल्या 15 वर्षांपासून 6 जूनला राज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन केले जाते. संपूर्ण देशभरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला अनन्य साधारण महत्व आहे. या ऐतिहासिक घटनेला आजही तेवढेच महत्त्व आहे. ही प्रेरणादायी घटना लाखों शिवभक्तांना अखंड प्रेरणा देत असते. त्यामुळे युवराज संभाजीराजे छत्रपती महाराजांनी पुन्हा या सोहळ्याला पूनर्वैभव प्राप्त करून दिले. आज हा सोहळा लोकोत्सव झाला असून, महाराष्ट्राच्या आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो शिवभक्त दरवर्षी रायगडावर येत असतात. मात्र, कोरोनाच्या या संकटामुळे सलग दुसऱ्या वर्षी हा सोहळा मोजक्याच शिवभक्तांच्या उपस्थितीत साजरा केला जात आहे.
शिवराज्याभिषेक सोहळा; निवडक मावळ्यांचा चमू रायगडकडे रवाना
महाराष्ट्राच्या आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो शिवभक्त दरवर्षी रायगडावर येत असतात. मात्र, कोरोनाच्या या संकटामुळे सलग दुसऱ्या वर्षी हा सोहळा मोजक्याच शिवभक्तांच्या उपस्थितीत साजरा केला जात आहे.