कोल्हापूर Sharad Pawar Birthday Celebration : कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यातील गोलिवडे हे शरद पवारांच्या मामाचं गाव. जेव्हा कधी शरद पवार कोल्हापूर दौऱ्यावर असतात तेव्हा ते आवर्जून आपल्या आजोळी भेट देतात. गावातील श्री योगी प्रभुनाथ महाराज फाउंडेशन आणि ग्रामस्थांच्या वतीनं ज्येष्ठ नागरिक महादेव कोंढरे यांच्या हस्ते या आजोळकरांनी केक कापून शरद पवारांचा वाढदिवस साजरा केला. यावेळी शरद पवारांना शतायुष्य लाभू दे अशी गावकऱ्यांनी ग्रामदैवत भैरवनाथ चरणी प्रार्थना देखील केली. देशाच्या राजकारणातील पितामह म्हणून ज्यांची ख्याती आहे असे खासदार शरद पवार (Sharad Pawar) आपल्या गावचे नातू आहेत याचा सार्थ अभिमान गोलिवडेकरांना आहे. 2018 मध्ये शरद पवारांनी आजोळी भेट दिली होती. यावेळी गावातील प्राथमिक शाळेला दोन कोटींचा निधी दिला होता, यातून गावातील प्राथमिक शाळेचं रूपडं पालटलं आहे.
गेली तीस वर्षे गोलिवडे ग्रामपंचायत बिनविरोध : देशासह राज्याच्या राजकारणात उलथापालथ होत असताना त्याचा केंद्रबिंदू कायमच शरद पवार राहिले आहेत. गेल्या 30 वर्षात एकदाही गोलिवडे गावची ग्रामपंचायत निवडणूक लागली नाही. गावातील ग्रामस्थांनी आपापसातील दुरावा खोडून काढत गेली तीस वर्षे ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध केली आहे. शरद पवार यांच्या आजोळ असलेल्या पन्हाळा तालुक्यातील गोलिवडेचे ग्रामस्थ यामुळं कौतुकाचा विषय बनले आहेत.
वाढदिवसानिमित्त बांधवासोबत स्नेहभोजन : कोल्हापूर शहरातली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांचा 83 वा वाढदिवस जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील आणि शहराध्यक्ष आर. के. पोवार यांच्या मार्गदर्शनाने पक्षाच्या शिवाजी स्टेडियम येथील शहर कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विशेष दिनाचा आनंद मिरजकर तिकटी येथील अंधशाळेतील मुलांसोबत स्नेहभोजन समारंभाने साजरा करण्यात आला.
हेही वाचा -