ETV Bharat / state

MLA Rutuja Latke : शाहुवाडीची सून अंधेरी पूर्वची आमदार; गावात गुलाल उधळत जल्लोष साजरा

Andheri East Bypoll Result : अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या आणि महविकास आघाडीच्या उमेदवार ऋतुजा लटके विजयी झाल्या आहेत.

author img

By

Published : Nov 6, 2022, 7:46 PM IST

Updated : Nov 6, 2022, 9:32 PM IST

Andheri East Bypoll Result
Andheri East Bypoll Result

कोल्हापूर: अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीत शिवसेना उद्भव बाळासाहेब ठाकरे गटाच्या आणि महविकास आघाडीच्या उमेदवार ऋतुजा लटके विजयी झाल्या आहेत. खरतर ऋतुजा लटके ह्या कोल्हापूरमधील शाहूवाडी तालुक्यातील धुमकवाडीच्या सून यामुळे निकाल जाहीर होताच शाहूवाडी तालुक्यातील सरुड, बांबवडे, शाहूवाडी, मलकापूर, येळवणजुगाई, शेंबवणे आदी परिसरातील लटके यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला आहे. मूळच्या शाहूवाडी तालुक्यातील ऋतुजा लटके यांच्या विजयाने संपूर्ण शाहुवाडी तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

शाहूवाडीची सून अंधेरी पूर्वची आमदार

शाहूवाडीत जल्लोष - अंधेरी पूर्वचे दिवंगत आमदार रमेश लटके यांचे मूळ गाव हे शाहूवाडी तालुक्यातील धुमकवाडी आहे. त्याच्या दुर्दैवी निधनाने येथे पोटनिवडणुक लागली. आणि या पोट निवडणुकीत त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी देण्यात आली. निवडणुकीच्या सुरुवातीपासूनच त्यांच्याविषयी असलेली राजकीय लढाई चांगलीच चर्चेत आली होती. सुरुवातीला भाजपने ही आपला उमेदवार या ठिकाणी दिला. मात्र राज ठाकरे आणि शरद पवार यांच्या सांगण्यावरून भाजपने ही उमेदवारी अर्ज मागे घेतला. यामुळे ऋतुजा लटके आणि अपक्ष उमेदवार असा सामना लढला गेला. यानंतर आज निकाल जाहीर होताच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मलकापूर शाहूवाडी या परिसरात अनेक ठिकाणी जल्लोष करण्यात आला.

बाळासाहेब ठाकरे यांचा विचारांचा मोठा प्रभाव - स्व. रमेश लटके यांच्यावर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचारांचा मोठा प्रभाव होता. यामुळे सेनेचा भगवा त्यांनी आपल्या हाती घेतला होता. दरम्यानच्या काळात स्व. रमेश लटके यांनी २००० मध्ये माजी श्रीमती संजीवनीदेवी गायकवाड व बाबासाहेब पाटील - सरुडकर यांच्या विरोधात सेनेच्या उमेदवारीवर शाहूवाडी विधानसभेची पोटनिवडणूकही लढवली होती. परंतू या निवडणूकीत त्यांना अपयशाला सामोरे जावे लागले होते. दरम्यान गेल्या २० वर्षात शिवसेनेत झालेल्या अनेक बंडानंतरही लटके कुटुंबीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या घराण्याशी एकनिष्ठ राहिले आहे.

आमच्या गावची सून आमदार - मात्र ग्रामीण भागातील एक युवक मुंबईसारख्या शहरांमध्ये जाऊन रमेश लटकेंच्या रूपान आमदार झाला. पण दुर्दैवाने त्यांचे अकाली निधन झाले आणि आमचा वाघ हरपला, अशी भावना त्यांच्या मूळ धुमवाडी गावातील नागरिकांनी व्यक्त केल्या होत्या. आज आमच्या गावची सून आमदार झाली, असे म्हणत खऱ्या अर्थाने धुमकवाडीकरांच्या डोळ्यातून आनंदाश्रू पाहायला मिळत होते. एकूणच अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीत ऋतुजा लटके यांनी मिळवलेला विजय हा शाहूवाडी तालुक्यातील त्यांच्या मूळ गावी आनंद उत्सव साजरा झाला.

Last Updated : Nov 6, 2022, 9:32 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.