ETV Bharat / state

Shahu Maharaj News : कोल्हापूर लोकसभा निवडणूक लढवण्याची पूर्वी इच्छा होती, कोल्हापूरच्या शाहू महाराजांचे वक्तव्य

author img

By

Published : Aug 19, 2023, 4:04 PM IST

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीनंतर शरद पवार हे राज्यात ठिकठिकाणी सभा घेत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून त्यांची २५ ऑगस्टला कोल्हापुरात जाहीर सभा होत आहे. या सभेचे अध्यक्षस्थान श्रीमंत शाहू महाराज छत्रपती हे भुषविणार आहेत.

Kolhapur News
श्रीमंत शाहू महाराज
प्रतिक्रिया देताना श्रीमंत शाहू महाराज

कोल्हापूर : कोल्हापुरात 25 ऑगस्टला शरद पवार यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेचे अध्यक्षपद कोल्हापूरचे छत्रपती श्रीमंत शाहू महाराज भुषवणार आहेत. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर लोकसभेच्या निवडणुकीबद्दल विचारल्यानंतर छत्रपती शाहू महाराजांनी यापूर्वी लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा होती असे म्हणत लोकसभा उमेदवारीबाबत संभ्रम कायम ठेवला आहे.

लोकसभेच्या जागेवर उमेदवार कोण असणार : राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभेच्या जागेवर वर्चस्व राहिलेल्या राष्ट्रवादीच्या फुटीनंतर आता, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभेच्या जागेवर उमेदवार कोण असणार? याबाबतच्या चर्चा सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर राज्यभर पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार झंझावती दौरा करत आहेत. येत्या 25 ऑगस्ट रोजी शरद पवार यांची कोल्हापूरच्या ऐतिहासिक दसरा चौक मैदानात जाहीर सभा होणार आहे. या सभेचे अध्यक्षस्थान कोल्हापूरचे छत्रपती श्रीमंत शाहू महाराज भूषवणार आहेत. या पार्श्वभूमीवर आज श्रीमंत शाहू महाराजांना याबाबत विचारले असता, यापूर्वी राष्ट्रवादीकडून लढण्याची इच्छा होती असे वक्तव्य त्यांनी केले आहे.

सर्वसमावेशक चेहरा म्हणून होऊ शकतो विचार : जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा जागांबाबत अजूनही चर्चेचे गुऱ्हाळ कायम आहे. 2009 पासून राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्ह्यातील दोन्ही जागा गमावल्या आहेत. मात्र आमदारांची संख्या लक्षात घेता काँग्रेसने कोल्हापूरच्या जागेवर दावा सांगितला आहे. महाविकास आघाडीकडून जिल्ह्यातील दोन्हीपैकी एक जागा काँग्रेसला मिळावी अशी मागणी काँग्रेस श्रेष्ठी करत आहेत. मात्र आता राष्ट्रवादीकडून थेट शरद पवारांनीच कोल्हापूरच्या जागेबाबत छत्रपती शाहू महाराजांना उमेदवारी दिल्यास, सर्व समावेशक चेहरा म्हणून श्रीमंत शाहू महाराजांचा विचार होऊ शकतो. अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

राजघराण्याला सर्व पक्षांचे साकडे : कोल्हापूरच्या राजघराण्याला राज्यात मोठा मानसन्मान आहे. यापूर्वी छत्रपती मालोजीराजे यांनी काँग्रेसकडून उमेदवारी मिळवत विधानसभा गाठली होती. तर आताच्या स्वराज पक्षाचे संस्थापक संभाजीराजे छत्रपती यांना राष्ट्रपती कोट्यातून भारतीय जनता पक्षाने खासदारकी बहाल केली होती. यामुळे कोल्हापूरचे राजघराणे ज्या पक्षाच्या बाजूने कौल देईल त्या पक्षाला जनाधार मिळणार असल्याने, राजघराण्याला सोबत घेण्यासाठी सर्वच राजकीय पक्षात चढाओढ सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

हेही वाचा -

  1. Kolhapur Riots: धार्मिक मुद्द्यांवरून कोल्हापुरात तणाव होणे शोभनीय नाही- छत्रपती शाहू महाराज
  2. Shiv Shahu Sadbhavana Rally: कोल्हापुरामध्ये आज शिव-शाहू सद्भावना फेरीचे आयोजन; पुरोगामी कोल्हापूरचा वारसा टिकविण्यासाठी प्रयत्न
  3. Sharad Pawar On Babasaheb Purandare : बाबासाहेब पुरंदरे यांच्याऐवढा अन्याय छत्रपती शिवाजी महाराजांवर कोणीही केला नसेल - शरद पवार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.