ETV Bharat / state

यंदाचा शाहू पुरस्कार पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने यांना जाहीर - छत्रपती राजर्षी शाहू महाराज

छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त देण्यात येणारा शाहू पुरस्कार यंदा डॉ. तात्याराव लहाने यांना जाहीर झाला आहे. राजर्षी शाहू महाराज मेमोरियल ट्रस्टच्या वतीने हा पुरस्कार देण्यात येतो. याबाबत जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी घोषणा केली आहे.

tatyarao lahane
यंदाचा शाहू पुरस्कार पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने यांना जाहीर
author img

By

Published : Jun 25, 2020, 6:22 PM IST

कोल्हापूर - छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त देण्यात येणारा शाहू पुरस्कार यंदा डॉ. तात्याराव लहाने यांना जाहीर झाला आहे. राजर्षी शाहू महाराज मेमोरियल ट्रस्टच्यावतीने हा पुरस्कार देण्यात येतो. याबाबत जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी घोषणा केली आहे.

यंदाचा शाहू पुरस्कार पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने यांना जाहीर

यंदाचा 35 वा शाहू पुरस्कार असून वैद्यकीय सेवेबद्दल डॉ. लहाने यांना गौरविण्यात येणार आहे. एक लाख रुपये, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुरस्कार वितरणाचा कोणताही सोहळा पार पडणार नसल्याचे यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सांगितले. कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आल्यास याबाबत कार्यक्रम घेतला जाईल, असे ते म्हणाले. परिस्थिती आटोक्यात न आल्यास प्रत्यक्ष भेटून पुरस्कार देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

या पत्रकार परिषदेला निवासी जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ.जयसिंगराव पवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांची उपस्थिती होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.