कोल्हापूर - आज तब्बल 74 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन आपल्या घरी गेले आहेत. सर्वच रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून, कोल्हापूरकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात मंगळवारी (2 जून) सकाळपासून रुग्णांची 7 नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे नवीन रुग्ण वाढीचे प्रमाण सुद्धा घटले आहे. जिल्ह्यात काल सापडलेल्या 7 रुग्णांसहित एकूण रुग्णांची संख्या 630 वर जाऊन पोहोचली आहे.
269 जण कोरोना मुक्त झाले असून,ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या आता केवळ 355 इतकी झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण 6 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, शाहुवाडीतील रुग्णांची संख्या मात्र वाढतच चालली आहे. मंगळवारी एकूण वाढलेल्या रुग्णांमध्ये 3 रुग्ण शाहूवाडी तालुक्यातील आहेत. एकट्या शाहुवाडीत सद्या 169 इतके एकूण रुग्ण झाले असून त्या पाठोपाठ चंदगडमध्ये 71 इतके रुग्ण झाले आहेत. कोल्हापूर शहरातील चित्र सुद्धा दिलासादायक आहे. आजपर्यंत शहरात केवळ 21 कोरोनाबाधित रुग्ण सापडले असून एकाचाही बळी गेला नाही.
एकूण आकडेवारीवर नजर टाकल्यास तालुकानिहाय कोरोनाबाधित रुग्णांची संख्या -
आजरा : 50
भुदरगड : 65
चंदगड : 71
गडहिंग्लज : 67
गगनबावडा : 6
हातकणंगले : 6
कागल : 53
करवीर : 12
पन्हाळा : 24
राधानगरी : 63
शाहूवाडी : 167
शिरोळ : 7
नगरपालिका क्षेत्र : 11
महानगरपालिका क्षेत्र : 21
इतर : 7
एकूण : 630
डिस्चार्ज : 269
मृत्यू : 6
ऍक्टिव्ह : 355