कोल्हापूर - कोल्हापुरात कोरोनाबधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. आज सकाळी प्राप्त अहवालानुसार एकूण रुग्णांची संख्या 341 वर जाऊन पोहोचली आहे. मात्र कोल्हापूरकरांना आज एक दिलासादायक बातमी मिळाली आहे. काल रविवारी रात्रीपासून आत्तापर्यंत एकूण रुग्णांपैकी 7 जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
यामध्ये शाहूवाडीमधील 4, पन्हाळा तालुक्यातील 1 आणि भुदरगड तालुक्यातील 1, चंदगड तालुक्यातील 1 अशा 7 रुग्णांचा समावेश आहे. गेल्या 10 ते 12 दिवसांपासून कोल्हापुरात एकसारखी रुग्णांची वाढ होत आहे. आत्ताच्या 7 जणांना पकडून आत्तापर्यंत एकूण 21 जण कोरोनामुक्त झाले आहेत तर 2 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
डिस्चार्ज दिलेले रुग्ण : शाहूवाडी 2 : 20 वर्षांचा माणगाव येथील तरुण, केरले येथील 23 वर्षांचा तरुण, गडहिंग्लज 2 : नेसरी येथील 40 वर्षांची महिला आणि 19 वर्षांचा तरुणपन्हाळा 1 : सातवे येथील 30 वर्षांचा तरुण, राधानगरी 1 : खिंडी व्हरवडे येथील 35 वर्षांची व्यक्ती,चंदगड 1 : अडकूर येथील 29 वर्षांचा तरुण यांचा समावेश आहे.