ETV Bharat / state

शाळेच्या पहिल्या दिवशी शिक्षकाने मुलांना आणले चक्क बैलगाडीतून; पन्हाळ्यातील दिगवडे शाळेचा उपक्रम - कोल्हापूर

शाळेचा पहिला दिवस म्हटले की हटके स्टाइलने नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत केल जाते. शहरात असणारी ही प्रथा आता कोल्हापूरच्या ग्रामीण भागात पोहचली आहे.

दिगवडे
author img

By

Published : Jun 17, 2019, 8:32 PM IST

कोल्हापूर - शाळेच्या पहिल्या दिवशी शिक्षकाने आपल्या नवीन विद्यार्थ्यांना चक्क बैलगाडीतून आणले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यामधील दिगवडे येथील शाळेतील बाजीराव पाटील असे या शिक्षकाचे नाव आहे.

दिगवडे (ता. पन्हाळा)

शाळेचा पहिला दिवस म्हटले की हटके स्टाइलने नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत केल जाते. शहरात असणारी ही प्रथा आता कोल्हापूरच्या ग्रामीण भागात पोहचली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील दिगवडे येथील प्राथमिक शाळेतील बाजीराव पाटील या शिक्षकाने आज शाळेच्या पहिल्या दिवशी नवीन विद्यार्थ्यांना चक्क सजवलेल्या बैलगाडीतून आणले. एवढेच काय तर ही बैलगाडी ऊस, रंगीबेरंगी फुगे आणि बैलांना झुल पांघरून सजवली होती. या सोबतच शाळेच्या बँड पथकानेही या नवीन विद्यार्थ्यांचे वाजत गाजत स्वागत केले. सर्व नवीन विद्यार्थ्यांची मिरवणूक गावातील प्रमुख रस्त्यावरून काढण्यात आली. तसेच त्यांचे उत्साहात शाळेत स्वागत करण्यात आले. या मिरवणुकीत गावकरी ही सहभागी झाले होते. नव्या विद्यार्थ्यांची आगळ्या-वेगळ्या स्टाईलने बैलगाडीतून काढलेली मिरवणूक सर्वत्र चर्चेचा विषय ठरली.

Intro:अँकर- शाळेच्या पहिल्या दिवशी शिक्षकाने आपल्या नवीन विद्यार्थ्यांना चक्क बैलगाडीतून आणलं आहे... कोल्हापूर जिल्ह्यातल्या पन्हाळा तालुक्यातल्या दिगवडे इथल्या शाळेतील बाजीराव पाटील अस या शिक्षकाचं नाव आहे.Body:व्हीओ-1- शाळेचा पहिला दिवस म्हटलं की हटके स्टाइलने नवीन विद्यार्थ्यांचं स्वागत केल जाते. शहरात असणारी ही प्रथा आता कोल्हापूरच्या ग्रामीण भागात पोहचली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील दिगवडे इथल्या प्राथमिक शाळेतील बाजीराव पाटील या शिक्षकाने आज शाळेच्या पहिल्या दिवशी नवीन विद्यार्थ्यांना चक्क सजवलेल्या बैलगाडीतुन आणले.. एवढेच काय तर ही बैलगाडी ऊस रंगीबेरंगी फुगे आणि बैलांना झुल पांघरून सजवली होती. या सोबतच शाळेच्या बँड पथकानेही या नवीन विद्यार्थ्यांचं वाजत गाजत त स्वागत केलं. सर्व नवीन विद्यार्थ्यांची मिरवणूक गावातील प्रमुख रस्त्यावरून काढण्यात आली तसेच त्यांचे उत्साहात स्वागत शाळेत करण्यात आलं... या मिरवणुकीत गावकरी ही सहभागी झाले होते. नव्या विद्यार्थ्यांची आगळ्या वेगळ्या स्टाईलने बैलगाडी तुन काढलेली मिरवणूक सर्वत्र चर्चेचा विषय ठरली.Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.