ETV Bharat / state

Rupali Chakankar criticism on Chandrakant Patil : चंद्रकांत पाटील यांनी अंतिम तारीख जाहिर करावी - रुपाली चाकणकर

मागील दोन वर्षांपासून कोरोना महामारीशी लढत असताना राज्यात बालविवाह होण्याचे प्रमाण वाढल्याचे राज्य महिला आयोग ( State Women Commission ) खास निदर्शनास आले की, बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार बालविवाह झाल्यास पूर्वी फक्त मुलाचे व मुलीचे आई, वडील तसेच घरची मंडळी व फोटोग्राफर यांच्यावर गुन्हा नोंद होत होता. मात्र, यात बदल करून आता बालविवाह सिद्ध झाल्यास ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि सदस्यांची पदे रद्द करा तसेच विवाह नोंदणी करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई, अशी शिफारस राज्य महिला मंडळाच्या वतीने राज्य सरकारकडे करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष रुपाली चाकणकर ( Rupali Chakankar ) यांनी दिले आहे.

author img

By

Published : Mar 12, 2022, 3:44 PM IST

Updated : Mar 12, 2022, 4:36 PM IST

रुपाली चाकणकर
रुपाली चाकणकर

कोल्हापूर - चंद्रकांत पाटील हे सरकार पाडण्याची रोज एक नवीन तारीख जाहीर करतात त्यांनी कोणततरी एकच अंतिम तारीख सांगावी, असा टोला राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर ( Rupali Chakankar ) यांनी लगावला आहे. चंद्रकांत पाटील ( Chandrakant Patil ) हे कोल्हापूरचे असूनही त्यांना पुण्यात येऊन एका महिलेचा सुरक्षित मतदारसंघाचा आधार घ्यावा लागला. कोल्हापुरातही मतदारांना रोज एक नवीन तारीख देत असतील. यामुळे ते पुण्यात आले, असे म्हणत सरकार पडण्याची रोज एक तारीख देण्यापेक्षा एकच अंतिम तारीख चंद्रकांत पाटलांनी द्यावी, असा टोला त्यांनी लगावला आहे.

बोलताना रुपाली चाकणकर

अर्थसंकल्पावर महिलावर्ग समाधानी - शुक्रवारी (दि. 11 मार्च) राज्याचे अर्थमंत्री अजित पवार ( Minister Ajit Pawar ) यांनी सादर केलेल्या अर्थ संकलपाचे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी स्वागत केले आहे. राज्यातील सर्व घटकांसाठी अर्थ संकल्प तरतूद केले असून खास करून विधवा महिलांसाठी आणि महिला सुरक्षासाठी मोठी तरतूद केली असून या बजेटमुळे महिलावर्ग समाधानी असल्याचे ही त्यांनी म्हटले आहे.

भाजपकडून महाविकास आघाडीला त्रास देण्याचे काम - महाविकास आघाडी स्थापन झाल्यापासून भाजपकडून कोणताही पुरावा नसताना विविध आरोप करण्याचे काम केले आहे. विरोधी पक्षांकडून नेहमीच साम, दाम, दंड, भेद वापरून महाविकास आघाडीला त्रास देण्यात येत आहे, असे आरोपही रुपाली चाकणकर यांनी भाजपवर केली आहे.

बालविवाह सिद्ध झाल्यास ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि सदस्यांची पदे रद्द करण्याची शिफारस - मागील दोन वर्षांपासून कोरोना महामारीशी लढत असताना राज्यात बालविवाह होण्याचे प्रमाण वाढल्याचे राज्य महिला आयोग खास निदर्शनास आले की, बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार बालविवाह झाल्यास पूर्वी फक्त मुलाचे व मुलीचे आई, वडील तसेच घरची मंडळी व फोटोग्राफर यांच्यावर गुन्हा नोंद होत होता. मात्र, यात बदल करून आता बालविवाह सिद्ध झाल्यास ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि सदस्यांची पदे रद्द करा तसेच विवाह नोंदणी करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई, अशी शिफारस राज्य महिला मंडळाच्या वतीने राज्य सरकारकडे करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी दिले आहे. खोट्या वयाची नोंद करून लग्न करण्याचे प्रमाणही वाढले असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तर नोंद नसलेले बालविवाह आहे मोठ्या प्रमाणात झाले असून एकट्या सोलापुरात रोखलेल्या बालविवाहाची संख्या 105 आहे. त्या आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते.

हेही वाचा - Maha Weather Update : राज्यात सकाळपासून ढगाळ वातावरण; अनेक भागांना अवकाळीचा धोका

Last Updated : Mar 12, 2022, 4:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.