ETV Bharat / state

रिझर्व्ह बँकेकडून कोल्हापुरातील सुभद्रा बँकेचा परवाना रद्द

कोेल्हापुरातील सुभद्रा लोकल एरिया बँकेचा परवाना आरबीआयने रद्द केला आहे. सुभद्रा लोकल एरिया बँकेने 2019-2020 या आर्थिक वर्षातील दोन तिमाहीममध्ये किमान नेटवर्थच्या मर्यादेचं उल्लंघन केल्याने भारतीय रिझर्व्ह बँकेने या बँकेचा परवाना रद्द केला आहे

kolhapur
रिझर्व्ह बँकेकडून कोल्हापुरातील सुभद्रा बँकेचा परवाना रद्द
author img

By

Published : Dec 25, 2020, 9:45 AM IST

कोल्हापूर- रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कोल्हापूरच्या सुभद्रा लोकल एरिया बँकेचा परवाना रद्द केला आहे. आरबीआयने याबाबत गुरुवारी माहिती दिली आहे. बँकेचे व्यवहार आणि कामगिरी भविष्यात ठेवीदारांच्या हिताचे नुकसान कारक ठरेल अशी होती त्यामुळे आरबीआयने ही कारवाई केली असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

मागच्या दोन तिमाहीतील कामगिरीचा परिणाम-

आरबीआयने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, वित्तीय वर्ष २०२० - २०२१ च्या दोन तिमाहींमध्ये बँकेने किमान निव्वळ किमतीची आवश्यकता पूर्ण केली नाही. तसेच सुभद्रा लोकल एरिया बँकेकडे आपल्या ठेवीदारांना पैसे परत देण्याची पुरेशी रक्कम आहे. "ज्याप्रकारे बँकेचे कामकाज सुरू होते,त्यानुसार ग्राहकांच्या व ठेवीदारांच्या हितावर विपरीत परिणाम होईल. त्यामुळे केंद्रीय बँकेने सुभद्रा लोकल एरिया बँकेला दिलेला परवाना रद्द केला आहे. 24 डिसेंबर 2020 पासून बँकिंग व्यवसाय बंद झाल्यापासून या बँकेवर आरबीआयचा निर्णय लागू करण्यात आला आहे.

बँक बंद करण्यासाठी उच्च न्यायालयात अर्ज-

परवाना रद्द झाल्यानंतर बँकिंग नियमन कायद्यांतर्गत सुभद्रा बँकेस कोणत्याही प्रकारची बँकिंग किंवा इतर कोणताही व्यवसाय तातडीने अंमलात आणण्यास बंदी घातली गेली आहे. बँक बंद करण्यासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला जाईल, असेही आरबीआयने म्हटले आहे. मात्र, सध्य स्थितीत या बँकेच्या ठेवीदारांमध्ये चिंतेच वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या ठेवी परत मिळवण्यासाठी खातेदार आता प्रयत्न करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.