ETV Bharat / state

Raju Shetty Ratnagiri District Ban: बारसू प्रकल्पाबाबत राजू शेट्टी यांना रत्नागिरी जिल्हा बंदी आदेश; सोशल मीडियावर फोटो किंवा व्हिडिओ प्रदर्शित करण्यास मनाई - बारसू प्रकल्पाबाबत राजू शेट्टी

बारसू प्रकल्पाबाबत सुरू असलेल्या आंदोलनामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना रत्नागिरी जिल्हाबंदी आदेश जारी करण्यात आला आहे. सोमवारी रात्री उशिरा रत्नागिरी पोलिसाकडून त्यांना ही नोटीस देण्यात आली आहे. त्यांना सोशल मीडियावर फोटो किंवा व्हिडिओ प्रदर्शित करण्यास मनाई आहे.

Raju Shetty Ratnagiri District Ban
राजू शेट्टी रत्नागिरी जिल्हा बंदी आदेश
author img

By

Published : May 2, 2023, 8:25 AM IST

राजू शेट्टी रत्नागिरी जिल्हा बंदी

कोल्हापूर : राजू शेट्टी यांना आजपासून रत्नागिरी जिल्हाबंदी बरोबर बारसू प्रकल्पाबाबत कोणतेही वक्तव्य अथवा सोशल मिडीयामध्ये पोस्ट, चित्र अथवा व्हीडीओ प्रदर्शित करण्याबाबतही बंदी घालण्यात आलेली आहे. सोमवारी रात्री उशिरा अप्पर जिल्हाधिकारी यांचेवतीने व जिल्हा पोलिस प्रमुख यांच्यावतीने रत्नागिरी पोलिस दलातील अधिकारी राजू शेट्टी यांच्या निवासस्थानी दाखल झाले. त्यानंतर त्यांना समक्ष ही नोटीस लागू केली आहे.

बारसू प्रकल्पास तीव्र विरोध : बारसू प्रकल्पास शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केलेला आहे. तरीही शासनाकडून त्याठिकाणी जबरदस्तीने जमीनी संपादित करण्याबाबत व सदर प्रकल्पाच्या जमीन गुणवत्तेबाबतच्या विविध चाचण्या घेण्यात येत आहेत. शेतकऱ्यांवर लाठीहल्ले, अश्रूधूरांचा वापर करून त्यांना सदर ठिकाणावरून हाकलून लावण्यात येत आहे. यामुळे राज्य सरकार व शेतकरी यांच्यामध्ये टोकाचा संघर्ष निर्माण झालेला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी या संघर्षामध्ये शेतकऱ्यांच्या बाजूने उडी घेतली आहे. त्यांचे प्रतिनिधी त्याठिकाणी ऊपस्थित राहून सदर प्रकल्पास विरोध केलेला आहे. तर राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांना मारहाण झाल्यानंतर आक्रमक पवित्रा घेत, चलो रत्नागिरीचा नारा ही दिला होता.

जिल्हाबंदीची नोटीस लागू : दरम्यान आता राजू शेट्टी यांनी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये व विविध ठिकाणी हिंसक आंदोलन केले. कायदा व सुव्यवस्था बिघडविल्याचे कारण दाखवित रत्नागिरी प्रशासनाने जिल्ह्यामध्ये ३१ मे अखेर राजू शेट्टी यांना जिल्हाबंदीची नोटीस लागू केली आहे. यामध्ये त्यांनी सोशल मिडीयावरही पोस्ट, चित्र अथवा व्हीडीओ प्रदर्शित करण्याबाबतही राजू शेट्टी यांच्यावर बंदी घातलेली आहे. अशी पोस्ट दिसल्यास गुन्हा दाखल करणार असल्याचे सांगितले आहे. दरम्यान राजू शेट्टी यांनी अशा नोटीशींना मी भीक घालत नाही. ज्या ठिकाणी शेतकरी संकटात सापडेल, त्या ठिकाणी मी त्यांच्यासोबत ठामपणे ऊभा राहणार असल्याचे सांगितले आहे. लोकशाहीच्या राज्यामध्ये मानवी हक्कावर गदा आणण्याचे काम सरकार करत आहे. राज्य सरकार जनरल डायरप्रमाणे वागू लागले आहे. काही मुठभर लोकांच्या हितासाठी सर्वसामान्य शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे काम करत आहे, अशी टिका राजू शेट्टी यांनी केली आहे.

हेही वाचा : Nanar And Barsu Refinery : नाणार पाठोपाठ बारसू रिफायनरीला विरोध थांबेना; जाणून घ्या, या दोन्ही प्रकल्पांबद्दल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.