ETV Bharat / state

भाजीपाला, दूध उत्पादक-विक्रेत्यांनाही कोरोना लस द्या, राजू शेट्टींची पंतप्रधानांकडे मागणी

भाजीपाला, दूध उत्पादक-विक्रेत्यांनाही कोरोना लस द्या, अशी मागणी राजू शेट्टीं यांनी पंतप्रधानांकडे केली आहे. या बाबत राजू शेट्टी यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्याशीही पत्रव्यवहार केला आहे.

author img

By

Published : Apr 19, 2021, 6:57 PM IST

कोल्हापूर
कोल्हापूर

कोल्हापूर - भाजीपाला, दूध उत्पादक तसेच विक्रेत्यांना कोरोना व्हॅक्सिनसाठी लावलेली वयाची अट शिथिल करून त्वरीत सर्वांचे लसीकरण करण्यात यावे, अशी मागणी करण्यात येत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी याबाबतची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

बहुतांश नागरिक 45 वर्षांखालील -

पत्राद्वारे राजू शेट्टी यांनी म्हंटले आहे की, राज्यासह देशात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने हाहाकार माजवलेला आहे. महाराष्ट्रात 15 दिवसांचे लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. या कालावधीत सर्व नागरिकांना भाजीपाला व दुधासारख्या शेती मालाचा सतत व अखंड पुरवठा कायम ठेवण्यात शेतकरी महत्वाची भूमिका निभावत आहेत. अलीकडे लॉकडाऊन परिस्थितीमुळे स्थानिक प्रशासन दूध व भाजीपाल्याच्या पुरवठ्यात गुंतलेल्या लोकांच्या हालचालींना परवानगी देत नाही किंवा त्यावर मर्यादा आणत नाही. यातील बहुतेक 45 वर्षाखालील लोक आहेत. भाजीपाला आणि दुधाच्या वाहतुकीचे काम करीत असलेल्या शेतकरी कुटुंबातील आहेत. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार लस केवळ 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना दिली जाते. या लोकांना जास्त धोका असल्याने 45 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांना लसी देण्याची परवानगी द्या जेणेकरून दूध आणि भाज्यांचा चक्रीय पुरवठा थांबू नये आणि या लोकांची आर्थिक स्थिती देखील बंद होणार नाही असेही शेट्टी यांनी म्हंटले आहे. शिवाय यामुळे कोविडचा प्रसार सुद्धा या लोकांद्वारे कमी होऊ शकतो असेही त्यांनी पत्रामध्ये म्हंटले आहे.

केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्याशीही पत्रव्यवहार -

दरम्यान, राजू शेट्टी यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्याशीही पत्रव्यवहार केला आहे. यामधून त्यांनी भाजीपाला, दूध उत्पादक तसेच विक्रेत्यांना कोरोना व्हॅक्सिनसाठी संबंधित विभागाला योग्य ते निर्देश द्यावेत, अशी मागणी केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.