कोल्हापूर - कोल्हापुरातील लिंगीचीवाडी, राधानगरी येथील स्टोन क्रशर व्यावसायिकावर कारवाई टाळण्यासाठी साडेपाच लाख रुपयाची लाच मागण्यात आली होती. ही लाच स्वीकारणाऱ्या राधानगरी येथील प्रांताधिकारी प्रसेनजित बबनराव प्रधान (वय 40) ( SDM Prasenjeet Pradhan ACB Trap ) आणि फराळे ग्रामपंचायतीचे सरपंच संदीप जयवंत डवर (वय 42) यांना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने ताब्यात ( Kolhapur ACB Trap On SDM Sarpanch ) घेतले. रविवारी दुपारी सेंट्रल बिल्डिंग मधील कार्यालयात ही कारवाई करण्यात आली. पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई ( Kolhapur Anti Corruption Bureau ) केली. या कारवाईने महसूल खात्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहेत. प्रांताधिकारी प्रसेनजीत प्रधान आणि सरपंच संदीप डवर यांच्यावर शाहूपुरी पोलीस ठाणे गुन्हा दाखल ( Crime Registered In Shahupuri Police Station ) करण्यात आला आहे.
अशी केली कारवाई
पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले की, तक्रारदार उद्योजकाचा फराळे ग्रामपंचायतीच्या हद्दीत स्टोन क्रशरचा व्यवसाय आहे. स्टोन क्रशरवरील अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे परिसरातील सर्व रस्ते खराब झाले आहेत. शिवाय धुळीमुळे प्रदूषण तसेच काही घरांच्या भिंतीना तडे गेले आहेत. या पार्श्वभूमीवर सरपंच संदीप डवर यांनी ग्रामपंचायतीच्यावतीने तक्रारदार व्यावसायिकास क्रशर का बंद करण्यात येऊ नये, याची कारणे दाखवा नोटीस बजावली होती. सरपंच डवर यांच्या नोटिशीच्या आधारे प्रांताधिकारी प्रधान यांनीही स्टोन क्रेशर व्यावसायिकास नोटीस बजावली होती. ही कारवाई टाळण्यासाठी व्यावसायिकाने सरपंच आणि प्रांताधिकारी यांची त्यांच्या कार्यालयात जाऊन भेट घेत विनंती केली होती. मात्र, सरपंच यांनी ही कारवाई टाळण्यासाठी प्रांताधिकारी प्रधान यांना दहा लाख रुपये आणि स्वतःला दरमहा एक लाख रुपयांची मागणी केली.
प्रांत कार्यालयात सापळा रचून कारवाई
व्यावसायिकाने आज रविवारी सकाळी प्रांताधिकारी यांच्या निवासस्थानी जाऊन सरपंच यांनी आपल्यासाठी दहा लाखाची मागणी केली असल्याचे संगितले. त्यावर प्रांताधिकार्यांनी संमती दर्शवून सरपंच यांच्याकडे पूर्तता करण्यास बजावले. आज दुपारी दोन वाजता सरपंच डवर आपल्या स्वतःच्या मोटारीमधून प्रांताधिकारी कार्यालय जवळ आले. त्यावेळी व्यावसायिकाकडून प्रांताधिकाऱ्यांसाठी पाच लाख आणि स्वतःसाठी ५० हजार रुपये स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंध पथकाचे पोलिस उपाधीक्षक आदिनाथ बुधवंत आणि त्यांच्या पथकाने सरपंचांना रंगेहात पकडले. सदरची कारवाई एसीबी पोलीस उपायुक्त राजेश बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक आदिनाथ बुधवंत, नितीन कुंभार, अजय चव्हाण, शरद कोरे, मयूर देसाई, रुपेश माने, अमर भोसले, विकास माने, नवनाथ कदम यांनी केली आहे.