ETV Bharat / state

कोल्हापुरातील पाणीदार आलाबाद गावाचा स्पेशल रिपोर्ट - Aalabad village

कागल तालुक्यातील आलाबाद या गावात शासनाच्या मदतीने आणि पंचक्रोशीतील गावकऱ्यांच्या श्रमदानातून राजे विक्रम सिंह घाडगे यांच्या फाउंडेशनच्या मदतीने गावात बंधारा उभारला. कागल तालुक्यात अशा पद्धतीने दहा ठिकाणी बंधाऱ्यांची उभारणी करण्यात आली आहे. यामुळे भूगर्भातील पाणीसाठा वाढला असून अशा बंधाऱ्यांमुळे सुमारे ५० हून अधिक विहिरी तुडुंब भरून वाहत आहेत.

कोल्हापुरातील पाणीदार आलाबाद गावाचा स्पेशल रिपोर्ट
author img

By

Published : May 9, 2019, 8:52 PM IST

कोल्हापूर - एकीकडे निम्म्याहून अधिक महाराष्ट्र दुष्काळाच्या झळा सोसतोय परंतु कोल्हापूर जिल्ह्यातील कागलमध्ये काहीसं वेगळं चित्र आहे. कागलचे राजे समरजीतसिंह घाडगे यांच्या पुढाकारातून आणि पंचक्रोशीतील गावकऱ्यांच्या श्रमदानातून आणि शासनाच्या मदतीने एरवी दुष्काळाच्या झळा असणार आलाबाद हे गाव पाणीदार झाले आहे. पाहुयात कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागल तालुक्यातील आलाबाद या गावाच्या जलक्रांतीचा स्पेशल रिपोर्ट.

कोल्हापुरातील पाणीदार आलाबाद गावाचा स्पेशल रिपोर्ट

महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील कोल्हापूर जिल्ह्यातील शेवटचे टोक म्हणजे कागल. याच कागल तालुक्यामध्ये चिकोत्रा सारखे लघु पाणी प्रकल्प रखडलेले आहेत. यामुळे या परिसरातील गावकऱ्यांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. काही गावांना तर एका गावातून दुसऱ्या गावात पाणी आणण्यासाठी जावे लागते. तसा पाऊस या तालुक्यात बरा पडतो,परंतु याच तालुक्यातील काही भाग दुष्काळाच्या छायेत असतो.

या परिस्थितीचा अभ्यास करून कागलचे राजे समरजित सिंह घाडगे यांनी तालुक्‍याचा कायापालट करायचे ठरवले. यासाठी गावकऱ्यांची मदत ही तितकीच महत्त्वाची आहे. गावकऱ्यांच्या पिण्याच्या पाण्याची वर्षानुवर्षाची समस्या सोडवण्यासाठी राजे समरजित सिंह घाडगे यांनी पुढाकार घेतला. कागल तालुक्यातील आलाबाद या गावात शासनाच्या मदतीने आणि पंचक्रोशीतील गावकऱ्यांच्या श्रमदानातून राजे विक्रम सिंह घाडगे यांच्या फाउंडेशनच्या मदतीने गावात बंधारा उभारला. कागल तालुक्यात अशा पद्धतीने दहा ठिकाणी बंधाऱ्यांची उभारणी करण्यात आली आहे. यामुळे भूगर्भातील पाणीसाठा वाढला असून अशा बंधाऱ्यांमुळे सुमारे ५० हून अधिक विहिरी तुडुंब भरून वाहत आहेत. जवळपास ५०० एकर पेक्षा जास्त क्षेत्र हे ओलिताखाली आले आहे. गावकऱ्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणि जनावरांच्या पाण्याचा प्रश्न यामुळे सुटला आहे.

यापूर्वी कागल तालुक्यातील आलाबाद गावात पिण्यासाठी पाणी उपलब्ध नव्हते गावकऱ्यांना वणवण करत पाणी दुसऱ्या गावातून आणावे लागायचे. त्यामुळे जनावरांना देखील पाणी उपलब्ध होत नव्हते. शासनाच्या मदतीने, गावकऱ्यांच्या श्रमदानातून आणि राजे विक्रम सिंह घाडगे फाउंडेशनच्या वतीने इथे श्रमदानातून बंधारा उभारला गेला. आता याच बंधाऱ्यावर पंचक्रोशीतील लोक येतात. विशेष म्हणजे मे महिन्यात सुद्धा हा बंधारा तुडुंब भरून वाहत आहे. या परिसरातील शेतीला चोवीस तास पाणी उपलब्ध करून दिले जात आहे. यामुळे या परिसरातील नागरिक आनंदित आहेत. खरं तर राज्यभर नव्हे तर जगभर कोल्हापूरची ओळख पाणीदार आहे, परंतु कागल तालुक्यातील काही भागात पडणारा दुष्काळ ही परिस्थिती देखील पाणी आडवा पाणी जिरवाच्या माध्यमातून आता बदलू लागली आहे.

Intro:अँकर- एकीकडे निम्म्याहून अधिक महाराष्ट्र दुष्काळाच्या झळा सोसतोय परंतु कोल्हापूर जिल्ह्यातील कागलमध्ये काहीसं वेगळं चित्र आहे. कागलचे राजे समर्जीतसिंह घाडगे यांच्या पुढाकारातून, पंचक्रोशीतील गावकऱ्यांच्या श्रमदानातून आणि शासनाच्या मदतीने एरवी दुष्काळाच्या झळा असणार आलाबाद हे गाव पाणीदार झाले आहे... पाहुयात कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागल तालुक्यातील आलाबाद या गावाच्या जलक्रांतीचा स्पेशल रिपोर्ट....Body:व्हीओ-1- महाराष्ट्राचे दक्षिणेकडील कोल्हापूर जिल्ह्यातील शेवटचे टोक म्हणजे कागल.... याच कागल तालुक्यामध्ये चिकोत्रा सारखे लघु पाणी प्रकल्प रखडलेले आहेत. यामुळे या परिसरातील गावकऱ्यांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. किंबहुना काही गावांना तर एका गावातून दुसऱ्या गावात पाणी आणण्यासाठी जावं लागतं. तसा पाऊस या तालुक्यात बरा पडतो परंतु याच तालुक्यातील काही भाग हा दुष्काळाच्या छायेत असतो. याच परिस्थितीचा अभ्यास करून कागलचे राजे समरजित सिंह घाडगे यांनी तालुक्‍याचा कायापालट करायचं ठरवलं. यासाठी गावकऱ्यांची मदत ही तितकीच महत्त्वाची... गावकऱ्यांच्या पिण्याच्या पाण्याची वर्षानुवर्षाची समस्या सोडवण्यासाठी राजे समरजित सिंह घाडगे यांनी पुढाकार घेऊन कागल तालुक्यातील आलाबाद या गावात शासनाच्या मदतीने पंचक्रोशीतील गावकऱ्यांच्या श्रमदानातून आणि राजे विक्रम सिंह घाडगे यांच्या फाउंडेशनच्या मदतीने या गावात बंधारा उभारला.. कागल तालुक्यात अशा पद्धतीने दहा ठिकाणी बंधाऱ्यांची उभारणी करण्यात आली आहे. यामुळे भूगर्भातील पाणीसाठा वाढला असून अशा अशा बंधाऱ्यांमुळे सुमारे 50 हून अधिक विहिरी तुडुंब भरून वाहत आहेत तर जवळपास ५०० एकर पेक्षा जास्त क्षेत्र हे ओलिताखाली आलं आहे. तसंच लोकांना गावकऱ्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणि जनावरांच्या पाण्याचा प्रश्न हा यामुळे सुटला आहे.

बाईट- समरजित सिंह घाडगे

व्हीओ-2- यापूर्वी कागल तालुक्यातील आलाबाद गावात पिण्यासाठी पाणी उपलब्ध नव्हतं लोकांना गावकऱ्यांना वणवण करत पाणी दुसऱ्या गावातून आणावं लागायचं त्यामुळे जनावरांना देखील पाणी उपलब्ध होत असायचं परंतु शासनाच्या मदतीने गावकऱ्यांच्या श्रमदानातून आणि आणि राजे विक्रम सिंह घाडगे फाउंडेशनच्या वतीने इथं श्रमदानातून बंधारा उभारला गेला आणि आता याच बंधाऱ्यावर ती ती पंचक्रोशीतील लोक येतात विशेष म्हणजे जे मे महिन्यात सुद्धा हा बंधारा तुडुंब भरून वाहत आहे तर या परिसरातील शेतीला चोवीस तास पाणी उपलब्ध करून दिले जात आहे यामुळे या परिसरातील नागरिक आनंदित आहेत

बाईट-संजय बरकाळे (गावकरी)

बाईट-साऊताई लोहार (महिला, गावकरी)

व्हीओ -3- खरं तर राज्यभर नव्हे तर जगभर कोल्हापूरची ओळख पाणीदार आहे परंतु कागल तालुक्यातील काही भागात पडणारा दुष्काळ ही परिस्थिती देखील पाणी आडवा पाणी जिरवा या माध्यमातून आता बदलू लागली आहे..Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.