ETV Bharat / state

चंद्रकांत पाटलांच्या साडी वाटपानंतर कोल्हापुरात लंगोट वाटून निषेध - कोल्हापूरकर

आमदार चंद्रकांत पाटील यांनी कोथरूड येथे महिलांना साड्या वाटल्याचा निषेध करत कोल्हापुरात चक्क लंगोट वाटून हे आंदोलन करण्यात आले.

लंगोट वाटताना
author img

By

Published : Nov 3, 2019, 7:26 PM IST

Updated : Nov 3, 2019, 7:49 PM IST

कोल्हापूर - कोल्हापूरकर कशाचा निषेध कशा पद्धतीने करतील याचा काही नेम नाही. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोथरूड मतदारसंघातील महिलांना साड्या वाटल्या म्हणून कोल्हापुरात उपहासात्मक आंदोलन करण्यात आले. साड्या वाटल्याचा निषेध करत चक्क लंगोट वाटून हे आंदोलन करण्यात आले. राजर्षी शाहू संघटनेतर्फे कोल्हापुरातील मोतीबाग तालमीतील पैलवानांना लंगोट वाटण्यात आले. यावेळी राजर्षी शाहू संघटनेच्या बाजीराव साळोखे आणि धैर्यशील साळोखे यांनी तीव्र शब्दात निषेध केला. या आगळ्या वेगळ्या आंदोलनाची आता कोल्हापूर जिल्ह्यात चर्चा सुरू आहे.

माहिती देताना साळोखे

कोथरूडमध्ये पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी 1 लाख महिलांना साड्या वाटल्या यावरून त्यांच्यावर सर्वत्र टीकेची झोड उठली आहे. कोल्हापुरातसुद्धा याचा राजर्षी शाहू संघटनेच्यावतीने निषेध व्यक्त करण्यात आला. चंद्रकांत पाटील यांनी आमच्यासमोर कोणताही पैलवान शिल्लक राहिला नाही, अशा प्रकारचे वक्तव्य केले होते. शिवाय निवडून आल्यानंतर कोथरूडमधील महिलांना साड्या वाटल्या. याचाच आम्ही निषेध करत असल्याचे आंदोलन बाजीराव साळोखे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. शिवाय हे आंदोलन होऊ नये यासाठी आमच्यावर काही कार्यकर्त्यांकडून दबाव आणण्याचा प्रयत्न सुद्धा झाला. पण, आम्ही त्यांना न जुमानता लंगोट वाटून आमचा निषेध व्यक्त केल्याचे धैर्यशील साळोखे यांनी म्हटले आहे.

Intro:कोल्हापूरकर कशाचा निषेध कशा पद्धतीने करतील याचा काही नेम नाही. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोथरूड मतदारसंघा मधल्या महिलांना साड्यावाल्या वाटल्या म्हणून कोल्हापुरात उपहासात्मक आंदोलन करण्यात आलं. साड्या वाटल्याचा निषेध करत चक्क लंगोट वाटून हे आंदोलन करण्यात आलं. राजर्षी शाहू संघटनेतर्फे कोल्हापुरातील मोतीबाग तालमीतील पैलवानांना लंगोट वाटण्यात आले. यावेळी राजर्षी शाहू संघटनेच्या बाजीराव साळोखे आणि धैर्यशील साळोखे यांनी तीव्र शब्दात निषेध केला. या आगळ्या वेळग्या आंदोलनाची आता कोल्हापूर जिल्ह्यात चर्चा सुरू आहे

Body:कोथरूड मध्ये पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी 1 लाख महिलांना साड्या वाटल्या यावरून त्यांच्यावर सर्वत्र टीकेची झोड उठली आहे. कोल्हापुरात सुद्धा याचा राजर्षी शाहू संघटनेच्यावतीने निषेध व्यक्त करण्यात आला. चंद्रकांत पाटील यांनी आमच्यासमोर कोणताही पैलवान शिल्लक राहिला नाहीये अशा प्रकारचे वक्तव्य केले होते. शिवाय निवडून आल्यानंतर कोथरूडमधील 1 महिलांना साड्या वाटल्या. याचाच आम्ही निषेध करत असल्याचे आंदोलन बाजीराव साळोखे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. शिवाय हे आंदोलन होऊ नये यासाठी आमच्यावर काही कार्यकर्त्यांकडून दबाव आणण्याचा प्रयत्न सुद्धा झाला पण आम्ही त्यांना न जुमानता लंगोट वाटून आमचा निषेध व्यक्त केल्याचे धैर्यशील साळोखे यांनी म्हंटले आहे.

Conclusion:.
Last Updated : Nov 3, 2019, 7:49 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.