ETV Bharat / state

अंबाबाईच्या चांदीच्या दागिन्यांना झळाळी; उद्या सोन्याच्या दागिन्यांची होणार स्वच्छता - अंबाबाई नवरात्रोत्सव कोल्हापूर

आज सुरुवातील चांदीच्या दागिन्यांसह पालखीला झळाळी देण्याचे काम पार पडले. उद्या याच पद्धतीने सोन्याच्या दागिन्यांना झळाळी देण्याचे काम करण्यात येणार असून लवकरच सर्व तयारी पूर्ण होत आहे.

अंबाबाईच्या चांदीच्या दागिन्यांना झळाळी
अंबाबाईच्या चांदीच्या दागिन्यांना झळाळी
author img

By

Published : Oct 13, 2020, 7:12 PM IST

कोल्हापूर - दरवर्षी कोल्हापुरातील करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात मोठ्या प्रमाणात नवरात्रोत्सव पार पाडतो. यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवरसुद्धा नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. मात्र, भक्तांविनाच यंदाचा नवरात्रोत्सव साजरा होणार आहे. येत्या 17 तारखेपासून उत्सवाला सुरुवात होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर तयारीला आता वेग आला आहे.

अंबाबाईच्या चांदीच्या दागिन्यांना झळाळी; उद्या सोन्याच्या दागिन्यांची होणार स्वच्छता

मंदिराच्या कळसाबरोबरच गाभाऱ्याची स्वच्छता पूर्ण झाली आहे. आता अंबाबाईच्या दागिन्यांची स्वच्छता सुरू असून आज सुरुवातील चांदीच्या दागिन्यांसह पालखीला झळाळी देण्याचे काम पार पडले. उद्या याच पद्धतीने सोन्याच्या दागिन्यांना झळाळी देण्याचे काम करण्यात येणार असून लवकरच तयारी पूर्ण होणार असल्याचे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले आहे.

हेही वाचा - प्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणतात कोल्हापूरचा 'नादच खुळा'; कारण माहितेय का?

यंदाचा नवरात्रोत्सव भक्तांविना साजरा होत असला तरी दरवर्षी प्रमाणेच साजरा करून देवीची विधीवत आणि विविध रूपात पूजा सुद्धा बांधण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, भक्तांनी एखाद्या वर्षी दर्शन घेतले नाही तरी चालेल, त्यांच्या जीवापेक्षा प्रत्यक्ष दर्शन महत्त्वाचे नाही, असे म्हणत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भक्तांनी ऑनलाईन आणि शहरातील स्क्रीन वरूनच देवीचे दर्शन घेण्याचे आवाहन केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.