कोल्हापूर: दीपावलीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठा अक्षरशः फुलून गेल्या आहेत. आकाशकंदील, पणत्या, रांगोळी, फटाके कपडे आदी वस्तू खरेदीसाठी लोकं बाहेर पडत आहेत. दिपावली आणि लक्ष्मीपूजनाच्या पार्श्वभूमीवर झेंडू फुलांना मोठी मागणी असते. Plastic marigold flowers मात्र यावर्षी बाजारपेठेत दरवर्षीच्या तुलनेत प्लॅस्टिकच्या झेंडू फुलांची मोठी आवक झाली आहे.
परिणामी शेतकऱ्यांच्या झेंडूला म्हणावी, तसे दर मिळत नाही. शिवाय जी फुलं घेऊन दरवर्षी हार बनवून घरात सजावट केली जात होती. त्याची जागी प्लॅस्टिकच्या फुलांनी घेतली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर झेंडू उत्पादन घ्यावे की नको हाच प्रश्न पडला आहे.

बंदी असताना कारवाई शून्य दरम्यान, प्लॅस्टिकला बंदी आहे. ठराविक मायक्रोनच्या खालील प्लॅस्टिकला बंदी आहे. मात्र बाजारात विविध प्लॅस्टिकच्या वस्तू तसेच झेंडुची फुलं आली आहेत. बिनदिक्कतपणे बाजारपेठेत ही फुलं विकली जात आहेत. याचा पर्यावरणाला किती मोठा धोका आहे. Plastic marigold flowers हे वेगळे सांगण्याची गरज नाही. मात्र तरीही याकडे संबंधित प्रशासन का पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे. एकीकडे शेतकऱ्यांचे प्रश्न समजणारे सरकार असे सांगितले जाते. मात्र त्याच्या फुल उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यवसायावर गदा आणणाऱ्या प्लॅस्टिक फुलांची निर्मिती करणारे तसेच विक्रेत्यांवर कारवाई होत नाही. याकडे सरकारने लक्ष घालून यावर तातडीने कारवाई करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

फूलविक्रेत्यांकडून झेंडूला चांगली मागणी आहे. झेंडूसह शेवंती, गुलछडी, लिली, गुलाब गड्डीला मागणी चांगली आहे. मात्र, फुले भिजलेली असल्याने खरेदीदारांकडून कमी प्रमाणात खरेदी केली जात आहे. बाजारात फुलांची आवक मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे.