कोल्हापूर - नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करणारे लोक देशद्रोही आहेत. आपला देश माणसांचा आहे पण, देशभक्तांचा नाही. हे आपले दुर्दैव आहे, असे वक्तव्य संभाजी भिडे यांनी केले आहे.
देशभक्त असलेल्या कुठल्याही नागरिकाला या कायद्याचे कौतुक वाटेल. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत असलेल्या कोट्यवधी भारतीयांना याचा आनंद झाला पाहिजे. मात्र, लोक याला विरोध करत आहेत. कायद्याला विरोध करून गालबोट लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. नागरिकत्व कायद्यावरून नंगा नाच सुरू आहे, असेही भिडे म्हणाले.
हेही वाचा - #CAA Protest LIVE : बिहारमध्ये एनआरसी लागू होणार नाही - नितिश कुमार
यापूर्वी ममता बॅनर्जी यांनी सुद्धा नागरिकांत्व सुधारणा कायदा लागू करा, अशी मागणी केली होती. त्याचा व्हिडिओही आता व्हायरल होतो आहे. शिवसेनेने या कायद्याला विरोध केलेला नाही आणि करणार नाही. फालतू माणसाबद्दल विचार करून राष्ट्राने आपला वेळ वाया घालवू नये. ज्यांना काही उंची नाही, अशी माणसेही राजकारणात आले हे देशाचे दुर्दैव आहे, अशी राहुल गांधी यांच्यावर अप्रत्यक्ष टीका संभाजी भिडे यांनी केली.