ETV Bharat / state

कोल्हापूर : नातेवाईकांनी केल्या विनवण्या मात्र, उपचारासाठी खाट न मिळाल्याने 'त्या' रुग्णाचा मृत्यू

कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात खाट उपलब्ध उपलब्ध नसल्याने गुरुवारी रात्री डॉक्टरांनी रुग्णास दाखल करून घेतले नाही. त्यामुळे उपचाराअभावी गांधीनगर येथील एकाचा मृत्यू झाला आहे.

रुग्णाचा मृत्यू
रुग्णाचा मृत्यू
author img

By

Published : Jul 24, 2020, 10:56 PM IST

कोल्हापूर : येथील छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयात खाट उपलब्ध नसल्यामुळे उपचाराविना एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. शहरानजीक असणाऱ्या गांधीनगरमधल्या 62 वर्षीय रुग्णाचा उपचाराविना मृत्यू झाला असून या प्रकाराने रुग्णाच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला आहे.

कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात सध्या कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गांधीनगरमध्ये सुद्धा रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सदर रुग्णाला काही दिवसांपासून त्रास होत होता. त्यामुळे त्यांनी परवा रात्री स्वॅब दिला मात्र, रिपोर्ट प्राप्त होण्याआधीच त्यांची प्रकृती बिघडली. त्यामुळे काल (गुरुवार) रात्री त्यांचे नातेवाईक त्यांना घेऊन सीपीआर रुग्णालयात आले. पण प्रशासनाकडून खाट उपलब्ध नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. रुग्णालय प्रशासनातील वैद्यकीय अधिकारी आणि नातेवाईक यांच्यातील संभाषण सद्या माध्यमांच्या हाती लागले असून त्या रुग्णाचे नातेवाईक संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना विनंती करत असल्याचे दिसून येत आहे. मात्र, रुग्णालयात खाट उपलब्ध नसल्याचे कारण रुग्णाच्या नातेवाईकांना सांगण्यात येत असल्याचे यातून दिसत आहे.

दरम्यान, रुग्णाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याबाबत अजून माहिती समजू शकलेली नाही. कोरोना चाचणीचा अहवाल आल्यानंतरच त्यांचा मृत्यू नेमका कोणत्या कारणाने झाला हे स्पष्ट होणार आहे. दरम्यान एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून रुग्णसंख्येत भर पडत आहे. अशातच रुग्णाच्या नातेवाईकांना कोरोनाबाबत शंका वाटत असतानाही संबंधित रुग्णाला खाट उपलब्ध झाली नाही ही गंभीर बाब असून प्रशासनाने याकडे वेळीच लक्ष देण्याची गरज आहे.

दरम्यान, कोल्हापूरमध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊनची अतिशय कडक अंमलबजावणी सुरू आहे. तरीही रुग्णांच्या संख्येत दररोजच वाढत असल्याने प्रशासनही हतबल झाले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.