ETV Bharat / state

ईटीव्ही भारत विशेष : गच्चीवरील भात शेतीचा यशस्वी प्रयोग; कोल्हापूरच्या अवलियाने साधली किमया

भाताची पेरणी करण्यासाठी त्यांनी प्लास्टिकच्या बॅरेलचा वापर केला आहे. बॅरेलचे दोन भाग करून त्यामध्ये माती भरून त्यामध्ये देशी वान असलेल्या भाताची पेरणी केली होती. जवळपास साडे तीनशे स्क्वेअर फुटांमध्ये त्यांनी अशा पद्धतीने भात पेरणी केली.

कोल्हापूर
कोल्हापूर
author img

By

Published : Oct 7, 2020, 8:04 PM IST

कोल्हापूर - घराच्या गच्चीवरील मोकळ्या जागेत शेती करण्याचा अभिनव प्रयोग कसबा बावडा येथे करण्यात आला आहे. येथील सुधाकर पाटील यांचा बँकिंग क्षेत्रातील सेवा पुरविण्याचा मूळचा व्यवसाय. या व्यवसायाबरोबरच त्यांना शेतीची सुद्धा प्रचंड आवड आहे. त्यामुळे ते नेहमी नैसर्गिक शेतीचे विविध प्रयोग करत असतात. यातूनच त्यांनी गच्चीवर उत्तम भातशेती केली आहे.

गच्चीवरील भात शेतीचा यशस्वी प्रयोग

मूळचे गडहिंग्लजचे असलेल्या सुधाकर पाटील यांनी गेल्या काही वर्षांपूर्वी कसबा बावडा येथे दोन ते अडीच हजार स्क्वेअर फुटांमध्ये घर बांधले. घराची रचना करताना त्यांनी जास्तीत जास्त गॅलरी आणि गच्चीवरील जागा फळ भाज्यांच्या लागवडीसाठी कशी उपयोगात आणता येईल याचा विचार केला. आजपर्यंत त्यांनी आपल्या गच्चीवर अनेक मसाले पदार्थ आणि फळ भाज्यांचे उत्पादन घेतले आहे. आता तर त्यांनी गच्चीवर भाताची शेती केली आहे. लॉकडाऊनमध्ये घरी बसून काय करायचे? हा विचार करत असतानाच त्यांना या भात शेतीची कल्पना सूचली. याद्वारे पुढचे 6 महिने सर्व कुटुंबाला पुरेल इतका तांदूळ मिळेल असाही त्यांना विश्वास आहे.

हेही वाचा - ईटीव्ही भारत इम्पॅक्ट : कोतोलीमधील बँक ऑफ इंडियाने घातला मंडप, नागरिकांची गैरसोय झाली दूर

भाताची पेरणी करण्यासाठी त्यांनी प्लास्टिकच्या बॅरेलचा वापर केला आहे. बॅरेलचे दोन भाग करून त्यामध्ये माती भरून त्यामध्ये देशी वान असलेल्या भाताची पेरणी केली होती. जवळपास साडे तीनशे स्क्वेअर फुटांमध्ये त्यांनी अशा पद्धतीने भात पेरणी केली. आता भाताची पूर्ण वाढ झाली असून पुढच्या आठवड्याभरात ते कापणी करणार आहेत. यासाठी त्यांनी कोणत्याही पद्धतीने रासायनिक खतांचा वापर केला नसून केवळ जीवामृताचा वापर केला आहे.

गच्चीवरील भात शेती
गच्चीवरील भात शेती

शेतीतज्ञ सुभाष पाळेकर यांच्या संपर्कात आल्याने त्यांना नैसर्गिक शेतीची आवड निर्माण झाली. त्यानंतर आजपर्यंत त्यांनी आपल्या गच्चीवर विविध प्रयोग केले आहेत. भाजी पाल्यांसह हळद, काळी मिरी, वेलची या मसाल्यांची झाडे सुद्धा त्यांनी गच्चीवर बनवलेल्या वाफ्यांमध्ये लावली. शिवाय तूर, मूग अशी कडधान्यांचीही यशस्वी पिके त्यांनी घेतली आहेत. पाटील यांच्या गच्चीवरील शेतीच्या या आगळ्या-वेगळ्या शेतीच्या प्रयोगाची सर्वत्र चर्चा सुरू असून अनेकांसमोर त्यांनी एक नवा आदर्श घालून दिला आहे.

हेही वाचा - शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. डी.टी. शिर्के यांची नियुक्ती

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.