ETV Bharat / state

Vedat Marathi Veer Daudle Saat : "वेडात मराठी वीर दौडले सात" चित्रपटाविरोधात नेसरी गाव एकवटला, इतिहास जाणून करा चित्रपट..

author img

By

Published : Nov 8, 2022, 3:27 PM IST

माजी खासदार छत्रपती संभाजीराजे ( Former MP Chhatrapati Sambhaji Raje ) यांनी दोन दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेत चुकीच्या पद्धतीने दाखवत असलेला इतिहास समोर आणत सर्व दिग्दर्शकांना धारेवर धरले. तसेच चुकीचा इतिहास दाखवल्यास गाठ माझ्याशी आहे, असा त्यांनी ईशारा दिला होता. यानंतर आता राज्यभरात संतप्त प्रतिक्रिया उमटत असून कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील नेसरी गावामध्ये जेथे प्रतापराव गुजर आणि बहलोल खानाचे युद्ध झाले या ठिकाणी आज ग्रामस्थांनी चित्रपटाला विरोध करत चुकीचा इतिहास आणि नावे दाखवल्यावरून मोर्चा काढत आपला निषेध नोंदवला आहे.

Etv Bharat
Etv Bharat

कोल्हापूर : माजी खासदार छत्रपती संभाजीराजे ( Former MP Chhatrapati Sambhaji Raje ) यांनी दोन दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेत चुकीच्या पद्धतीने दाखवत असलेला इतिहास समोर आणत सर्व दिग्दर्शकांना धारेवर धरले. तसेच चुकीचा इतिहास दाखवल्यास गाठ माझ्याशी आहे, असा त्यांनी ईशारा दिला होता. यानंतर आता राज्यभरात संतप्त प्रतिक्रिया उमटत असून कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील नेसरी गावामध्ये जेथे प्रतापराव गुजर आणि बहलोल खानाचे युद्ध झाले या ठिकाणी आज ग्रामस्थांनी चित्रपटाला विरोध करत चुकीचा इतिहास आणि नावे दाखवल्यावरून मोर्चा काढत आपला निषेध नोंदवला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील नेसरी ग्रामस्थ निषेध व्यक्त करताना

छत्रपती संभाजी राजे यांनी दिला होता इशारा - गेल्या काही दिवसांपूर्वीच महेश मांजरेकर यांचे वेडात मराठी वीर दौडले सात हा चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले. मात्र या चित्रपटातील पोस्टरमध्ये चुकीच्या पद्धतीने इतिहास दाखवण्यात आला असून योद्ध्यांची नावे देखील बदलण्यात आल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. तसेच इतिहासकरांनी ही गेल्या काही दिवसांपासून इतिहासाची मोडतोड करून चित्रपट बनवत असल्याच आरोप होत आहेत तर संभाजीराजे छत्रपती (Chhatrapati Sambhaji Raje ) यांनी देखील पत्रकार परिषद घेत चुकीच्या पद्धतीने इतिहास दाखवला तर गाठ माझ्याशी आहे. असा सज्जड दम सर्व दिग्दर्शकांना दिला.

खरा चित्रपट पाहून चित्रपटाची निर्मिती करा - आज कोल्हापुरातील गडहिंग्लज तालुक्यातील नेसरी गावात जिथे खिंडीत प्रतापराव गुजर आणि सात मराठ्यांचा युद्ध झाले. या गावात मोर्चा काढत निषेध नोंदवला. यावेळी नेसरी मधील गावकरी एकत्र येत जेथे प्रतापराव गुजर आणि बहलोल खानाचे युद्ध झाले होते तेथे एकत्रित हा निषेध नोंदवला आहे. यावेळी सर्व गावकऱ्यांनी महेश मांजरेकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी येथे या आणि खरा इतिहास पाहून त्या प्रकारे चित्रपटाची निर्मीती करा. चित्रपटातील योध्यांचा पोशाख बदलण्यात यावा, अशी देखील मागणी येथील आंदोलक गावकऱ्यांनी केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.