ETV Bharat / state

चंद्रकांत पाटलांच्या कालावधीत पदवीधरांचे प्रश्न कमी होण्याऐवजी वाढतच गेले - जयंत पाटील

author img

By

Published : Nov 22, 2020, 4:19 PM IST

पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारासाठी आज कोल्हापुरात महाविकास आघाडी सरकारचा मेळावा झाला. यावेळी प्रमुख वक्त्यांनी अरुण लाड आणि प्राध्यापक जयंत आसगावकर यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचा शब्द देत असतानाच भारतीय जनता पक्षावर टीकेची झोड उठवली.

कोल्हापूर
कोल्हापूर

कोल्हापूर - भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या पुणे पदवीधर मतदारसंघामधील कालावधीत पदवीधरांचे प्रश्न कमी होण्याऐवजी वाढतच गेले. पण, आता गेल्या दोन निवडणुका शिवसेनेच्या साथीला जिंकणाऱ्या भारतीय जनता पक्षाला यावेळी शिवसेनेचे उणीव निश्चितच जाणवेल, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारासाठी आज कोल्हापुरात महाविकास आघाडी सरकारचा मेळावा झाला. यावेळी प्रमुख वक्त्यांनी अरुण लाड आणि प्राध्यापक जयंत आसगावकर यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचा शब्द देत असतानाच भारतीय जनता पक्षावर टीकेची झोड उठवली. यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, मंत्री विश्वजीत कदम यांच्यासह महाविकास आघाडीचे दिग्गज नेते उपस्थित होते.

कोल्हापूर

दोघांनाही प्रथम पसंती क्रमांकाचे मतदान देऊन विजय करा -
महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवार अरुण लाड आणि जयंत आसगावकर यांना प्रथम पसंती क्रमांक मतदान करून विजय करावे. विरोधी पक्षाने दुसऱ्या क्रमांकाचे मत आपल्याला द्यावे, असे आवाहन केले, तर त्याला बळी पडू नका. कारण यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवारच धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही यावेळी जयंत पाटील यांनी म्हटले. गेल्या निवडणुकीत याचाच फटका बसला असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले.
ऑपरेशन लोटस करण्याचा प्रयत्न करू नये, तो फसेलच -
भाजपकडून महाविकास आघाडी सरकार केव्हा एकदा पडेल याचाच प्रयत्न सातत्याने चालू आहे. मात्र, आमचे तीन पक्ष जर एकत्र असतील तर आमचा एक सुद्धा आमदार फुटणार नाही. जर कोणताही आमदार फुटला आणि ऑपरेशन लोटस राबवण्याचा प्रयत्न केलाच तर तो प्रयत्न यशस्वी सुद्धा होणार नसल्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे. शिवाय आम्ही सर्व एकत्र असेल तर पुढची 25 वर्षे महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार राहील, असा विश्वास सुद्धा त्यांनी यावेळी व्यक्त केला.
उदय सामंत यांचे राणे यांच्यावर टीकेचे बाण -
शिवसेनेचे संपर्क नेते आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यावर टीकेचे बाण सोडले. महाविकास आघाडी सरकारबद्दल राणे व्यक्त करत असलेली भविष्यवाणी कधीच खरी होणार नाही. 5 वर्षे सत्तेवर असणाऱ्या भाजप सरकारने शिक्षण विभागाशी संबंधित 67 आदेश काढले आणि ते लगेच मागे घेतले, अशी टीका सुद्धा सामंत यांनी व्यक्त केली. भारतीय जनता पक्ष खोटे बोलून आपले राजकीय दुकान चालवत आहे, पण या खोट्या बोलण्याने त्यांच्या उमेदवाराला मते मिळणार नाहीत असेही त्यांनी यावेळी म्हटले.
आमचे उमेदवार पदवीधर तसेच शिक्षकांचे प्रश्न सोडवतील -
यावेळी कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सुद्धा महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड आणि जयंत आसगावकर यांनाच पहिल्या पसंतीचे मत देण्याचे आवाहन केले. शिवाय आम्ही दिलेले दोन्ही उमेदवार सक्षम आणि कार्यक्षम असल्याने पदवीधर तसेच शिक्षकांचे प्रश्‍न सुटण्यास निश्चित मदत होईल, असा विश्वास सुद्धा त्यांनी यावेळी व्यक्त केला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.