ETV Bharat / state

'राजर्षी शाहू महाराजांचे स्मारक नव्या पिढीली आधुनिकतेचा आणि समतेचा विचार देईल' - कोल्हापूरमध्ये छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या समाधी स्थळाचं लोकार्पण

या देशात राजे अनेक झाले, पण ज्यावेळी समाजाचे सत्व गेले होते, त्यावेळी समाजाला संघटीत करण्याचे काम छत्रपती शाहू महाराजांनी केल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. शरद पवारांच्या हस्ते आज कोल्हापूरमध्ये छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या समाधी स्थळाचं लोकार्पण झाले. त्यानंतर ते बोलत होते. शाहू महाराजांचे हे स्मारकं नव्या पिढीला आधुनिकतेचा समतेचा विचार देईल असेही पवार म्हणाले.

sharad pawar inauguration chhatrapati shahu maharaj memorial in kolhapur
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार
author img

By

Published : Jan 19, 2020, 2:39 PM IST

Updated : Jan 19, 2020, 3:31 PM IST

कोल्हापूर - या देशात राजे अनेक झाले, पण ज्यावेळी समाजाचे सत्व गेले होते, त्यावेळी समाजाला संघटीत करण्याचे काम छत्रपती शाहू महाराजांनी केल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. शाहू महाराजांनी सत्ता ही उपेक्षित घटकांसाठी वापरली. त्यांनी शिक्षण शेती, मल्लविद्या, उद्योग, व्यापार याचा व्यापक विचार केला होता. तसेच एका ठिकाणी महाराजांनी त्यांच्यापेक्षा मोठ्या पैलवानाशी कुस्ती जिंकून, कुस्ती ही शक्तीने नाहीतर युक्तीने जिंकता येते हे दाखवून दिल्याचे पवार म्हणाले. शाहू महाराजांचे हे स्मारक नव्या पिढीला आधुनिकतेचा व समतेचा विचार देईल, असेही पवार म्हणाले.

शरद पवारांच्या हस्ते आज कोल्हापूरमध्ये छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या समाधी स्थळाचं लोकार्पण झाले. यावेळी व्यासपीठावर छत्रपती शाहू महाजार, छत्रपती संभाजीराजे, छत्रपती मालोजीराजे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील, खासदार धैर्यशील माने, इतिहासतज्ज्ञ जयसिंग पवार यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होते.

sharad pawar
शरद पवारांच्या हस्ते छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या समाधी स्थळाचं लोकार्पण

शाहू महाराजांचे कर्तृत्व हे राज्यभरत नव्हते तर देशभर होते. देशातील अनेक ठिकाणी त्यांच्या कार्याचा गौरव केला जात असल्याचे शरद पवार म्हणाले. त्यांनी त्या काळी आरक्षण देण्याचा घेतलेला निर्णय खूप मोठा असल्याचे पवार म्हणाले. शाहू महाराजांनी कधीही कोणतीही जात पात पाहिली नाही. तर तो माझ्या समाजाचा, राज्याचा घटक असून, तो महत्वाचा असल्याचे पवार म्हणाले.

sharad pawar
शरद पवार आणि शाहू महाराज

प्रशासनाचा आदर्श

शाहू महाराजांनी त्या काळात योग्य प्रशानाचा आदर्श घालून दिला होता. शिस्त कशी असती हे त्यांनी दाखवून दिले. समाजातल्या शेवटच्या माणसांबद्दल करुणा होती. आज कोल्हापूरमध्ये जी समृद्धी दिसते त्याची बीजे शाहू महाराजांनी रोवल्याचे पवार म्हणाले. राधानगरी धरण बांधून त्यांनी शेती संपन्न करण्याचा प्रयत्न केला. तसेच धरणावर विजनिर्मिती करुन उद्योगाला चालना देण्याचे काम केल्याचे पवार म्हणाले.

Intro:Body:

'राजर्षी शाहू महाराजांचे स्मारक नव्या पिढीली आधुनिकतेचा आणि समतेचा विचार देईल'

कोल्हापूर -  या देशात राजे अनेक झाले, पण ज्यावेळी समाजाचे सत्व गेले होते, त्यावेळी समाजाला संघटीत करण्याचे काम छत्रपती शाहू महाराजांनी केल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. शाहू महाराजांनी सत्ता ही उपेक्षीत घटकांसाठी वापरली. त्यांनी शिक्षण शेती, मल्लविद्या, उद्योग, व्यापार याचा व्यापक विचार केला होता. तसेच एका ठिकाणी महाराजांनी त्यांच्यापेक्षा मोठ्या पैलवानाशी कुस्ती जिंकून कुस्ती ही शक्तीने नाहीतर युक्तीने जिंकता येते हे दाखवून दिल्याचे पवार म्हणाले. शाहू महाराजांचे हे स्मारकं नव्या पिढीला आधुनिकतेचा समतेचा विचार देईल असेही पवार म्हणाले.

शरद पवारांच्या हस्ते आज कोल्हापूरमध्ये छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या समाधी स्थळाचं लोकार्पण झाले. यावेळी व्यासपीठावर छत्रपती शाहू महाजार, छत्रपती संभाजीराजे, छत्रपती मालोजीराजे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील, खासदार धैर्यशील माने, इतिहासतज्ज्ञ जयसिंग पवार यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होते.

शाहू महाराजांचे कर्तृत्व हे राज्यभरत नव्हते तर देशभर होते. देशातील अनेक ठिकाणी त्यांच्या कार्याचा गौरव केला जात असल्याचे शरद पवार म्हणाले. त्यांनी त्या काळी आरक्षण देण्याचा घेतलेला निर्णय खूप मोठा असल्याचे पवार म्हणाले. शाहू महाराजांनी कधीही कोणतीही जात पात पाहिली नाही. तर तो माझ्या समाजाचा, राज्याचा घटक असून, तो महत्वाचा असल्याचे पवार म्हणाले.

प्रशासनाचा आदर्श 

शाहू महाराजांनी त्या काळात योग्य प्रशानाचा आदर्श घालून दिला होता. शिस्त कशी असती हे त्यांनी दाखवून दिले. समाजातल्या शेवटच्या माणसांबद्दल करुणा होती. आज कोल्हापूरमध्ये जी समृद्धी दिसते त्याची बीजे शाहू महाराजांनी रोवल्याचे पवार म्हणाले. राधानगरी धरण बांधून त्यांनी शेती संपन्न करण्याचा प्रयत्न केला. तसेच धरणावर विजनिर्मिती करुन उद्योगाला चालना देण्याचे काम केल्याचे पवार म्हणाले. 

Conclusion:
Last Updated : Jan 19, 2020, 3:31 PM IST

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.