ETV Bharat / state

Sanjay Raut News: कसब्यात टरबूज फुटला, असे म्हणत संजय राऊतांनी उडवली देवेंद्र फडणवीस यांची खिल्ली

पुण्यातील कसब्यातील निकाल म्हणजे परिवर्तनाची नांदी आहे. देवेंद्र फडणवीस यांना आता कळले असेल की, खरी शिवसेना कुठे आहे. भाजपबरोबर आतापर्यंत शिवसेना होती म्हणून भाजपचे बालेकिल्ले सुरक्षित होते. मात्र येथून पुढे भाजपचा प्रत्येक बालेकिल्ला उध्वस्त करू. चिंचवडमध्ये तिसरा उमेदवार उभा करून भाजपने मतांचे फटाफट केल्याने तेथे वेगळा निकाल लागला. मात्र कसब्यातील भाजपच्या बालेकिल्लाला सुरुंग लावण्याचे काम महाविकास आघाडीने केले, अशा शब्दात खासदार संजय राऊत यांनी विजयानंतर प्रतिक्रिया दिली आहे.

Sanjay Raut
संजय राऊत
author img

By

Published : Mar 3, 2023, 9:54 AM IST

कोल्हापूर : खासदार संजय राऊत यांनी यावेळी बोलताना त्यांनी भाजप व शिंदे सरकारवर जोरदार टीका केली आहे. शिवसेना खोक्याने विकत घेता येत नाही हे आज पुण्यात दिसून आले. कसबा हा भाजपचा बालेकिल्ला म्हणत ही पेठ आमची, ती पेट आमची असे भाजपचे नेते म्हणत होते. मात्र आज सर्व पेठा कोसळल्या. इतका दिवस भाजपासोबत शिवसेना होती, म्हणून तुम्ही जिंकत होता. मात्र कसब्यात टरबूज फुटला, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. ते कोल्हापुरातील इचलकरंजी शहरात बोलत होते.

भाजपचे प्रत्येक बालेकिल्ले उध्वस्त करू: तसेच कोणता मिंदे आणि डुप्लिकेट शिवसेना येणार नाही. इतके दिवस आमच्या खांद्यावर बसून तुम्ही आलात, मात्र आता याच खांद्यावर तुमची तिरडी काढणार. तुम्हाला आम्हाला संपवता येणार नाही. हा निकाल तुमच्या छाताड्यावरचा पहिले पाऊल आहे, असे म्हणत यापुढे भाजपचे प्रत्येक बालेकिल्ले उध्वस्त करू एकनाथ शिंदे सुद्धा हारणार. कारण ठाणे पहिल्यापासून शिवसेनेचे आहे. येथील महापालिकेवर शिवसेनेचा झेंडा फडकणार ,हिंमत असेल तर निवडणुका घेऊन दाखवा असेही संजय राऊत म्हणाले आहेत.

टिल्लू पोरग मला धमकी देत आहे : इचलकरंजीमध्ये झालेल्या शिवगर्जना यात्रेच्या सभेत मोठ्या प्रमाणात शिवसैनिक आले होते. संपूर्ण सभागृह हाउसफुल झाले होते. 50 खोके, एकदम ओके यासह जोरदार घोषणाबाजी सुरू होती. संजय राऊत यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना 2024 साली राज्याचा मुख्यमंत्री आणि देशाचा मुख्यमंत्री कोण होणार? हे पहाच. मग बघू कोण ईडी आणि कोण सीबीआय? असे ते म्हणाले. येताना मी इडीला 2024 ला भेटू, असे म्हणून आलो आहे, असे राऊत म्हणाले. त्यांनी नितेश राणे यांनी सभागृहात केलेल्या वक्तव्यावरून त्यांनी जोरदार खिल्ली उडवली. याची सिक्युरिटी काढा म्हणून नारायण राणे यांचे टिल्लू पोरगं मला धमकी देत आहे, तुझे सरकार आहे सिक्युरीटी काढून दाखव, असे ते म्हणाले.

शिंदे गटातील 40 आमदारांची खिल्ली : कोकणात शिवसैनिक आले म्हणून तू लपून बसणारा, तर तिकडे शिंदे गटात गेलेले प्रताप सरनाईक, प्रियंका चतुर्वेदी यांना ईडीची आणि सीबीआयची नोटीस येताच ते खोके घेऊन मिंदे गटात पळून गेले. मी 40 जणांना चोर म्हणालो, म्हणून अनेक लोक तुम्ही चोरांचा अपमान केला असे मला म्हणाले. ते चोर नसून दरोडेखोर आहेत. चोर देखील प्रामाणिक असतात. त्यांची देखील काहीतरी तत्त्व असतात. तुम्ही चोरांचा अपमान केला म्हणून त्याची माफी मागा असे अनेक जणांनी म्हटले, म्हणून मी चोरांची माफी मागतो, असे म्हणत शिंदे गटातील 40 आमदारांची खिल्ली उडवली.

भाजप यांना तिकीट देणार नाही : तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अनाजी पंत म्हणत जे नेहमी सर्वांना ज्ञान देत असतात. ते 2019 साली अमित शाह आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीदरम्यान एक करार झाला होता. ज्यामध्ये मुख्यमंत्री पदासह सत्तेतील पदांचा समसमान वाटप होईल, असे म्हणाले आणि नंतर पलटी मारली. आता मात्र स्वत: उपमुख्यमंत्री झाले. गटातील लोकांना 50 खोके दिले असे असले, तरी दिवार सिनेमाप्रमाणे या गद्दाराच्या घरच्यांना कपाळावर मेरा बाप, पती, भाई गद्दार म्हणून घेऊन फिरावे लागेल. संजय राऊत यांनी पुढील काळात भाजप देखील यांना तिकीट देणार नाही, अशी जहरी टीका शिंदे गटातील नेत्यांवर केली आहे.

हेही वाचा : Maharashtra Budget Session 2023: अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज पाचवा दिवस; राज्यपालांच्या अभिभाषणावर मुख्यमंत्री देणार उत्तर

प्रतिक्रिया देताना संजय राऊत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.