कोल्हापूर - फास्टटॅग अनिवार्य करूनही जर वाहनधारकांचा टोलनाक्यावर वेळ वाचत नाही, तर मग या फास्टटॅगचा काय उपयोग? असा सवाल मनसे नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे यांनी विचारला आहे. मंगळवारी रात्री किनी टोलनाक्यावरून रुपाली पाटील प्रवास करीत होत्या. यावेळी टोलनाक्यावर फास्टटॅगधारक वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. तब्बल २ तास वाहनधारकांना रांगेत उभे राहावे लागल्याने लोकांची पिळवणूक थांबवा अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन करू असा इशारा पाटील यांनी यावेळी दिला.
फास्टटॅगला ब्रेक..! मनसे नेत्या रुपाली पाटलांचा कोल्हापूरच्या किनी टोल नाक्यावर राडा - टोलनाक्यावर फास्टटॅग अनिवार्य
मंगळवारी रात्री किनी टोलनाक्यावर फास्टटॅग असूनही वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. यामुळे संतापलेल्या मनसे नेत्या रुपाली पाटील यांनी टोल नाक्यावर दंगा घालत रांगेतील सर्व गाड्या सोडण्यास तेथील कर्मचाऱ्यांना भाग पाडले. वाहनधारकांना 3 मिनिटांपेक्षा जास्त वेळ आपण थांबवू शकत नसल्याचे म्हणत नागरिकांना असा त्रास झाला तर मनसे स्टाईलने आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला.