कोल्हापूर - खराब रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी आता पन्हाळा तालुक्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. येथील महत्वाची बाजारपेठ असलेल्या कोतोली ते कोलोली दरम्यानचा रस्ता गेल्या अनेक दिवसांपासून धोकादायक बनला आहे. मात्र त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला आहे. याचा निषेध करण्यासाठी आज मनसेकडून अनोखे आंदोलन करण्यात आले.
पन्हाळा तालुक्यातील मनसेच्या कार्यकर्त्यांनी खड्ड्यांभोवती रांगोळी आणि हार घालत आंदोलन केले. तसेच रस्ता खराब असल्यामुळे या मार्गावर अनेकवेळा छोट्या - मोठ्या अपघाताच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे चौकात अपघाताचे चित्र लावून मनसेकडून प्रशासनाचा निषेध करण्यात आला. यावेळी आंदोलकांनी बांधकाम विभागाच्या उपअभियंत्यांना खड्ड्याला हार घालायला लावला. तातडीने रस्ता खड्डेमुक्त करण्यात येईल, असे आश्वासन मिळाल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनामुळे परिसरात काहीकाळ वाहतूककोंडी निर्माण झाली होती.
हेही वाचा - 6 हजारांची लाच घेतांना महावितरणच्या अभियंत्याला अटक
हेही वाचा - विवाहित प्रेयसीची प्रियकराने केली गळा आवळून हत्या; २४ तासात आरोपीच्या आवळल्या मुसक्या