ETV Bharat / state

अनलॉक - 5.0 : हॉटेल्स-बार आजपासून पूर्ववत

राज्य‌ शासनाच्या‌ आदेशानुसार शहरातील हॉटेल, फूड कोर्ट, रेस्टॉरंट बार आजपासून 50 टक्के क्षमतेने सुरू ठेवण्यात येणार आहेत.

mission begin again
अनलॉक - 5.0 : हॉटेल्स-बार आजपासून पूर्ववत
author img

By

Published : Oct 5, 2020, 12:12 PM IST

कोल्हापूर - राज्य‌ शासनाच्या मिशन बिगीन अगेन अंतर्गत शहरातील हॉटेल, फूड कोर्ट, रेस्टॉरंट बार आजपासून (5 ऑक्टोबर) 50 टक्के क्षमतेने सुरू झाले आहेत. त्यामुळे खवय्ये आणि तळीरामांना दिलासा मिळाला आहे. मात्र, अद्याप शाळा, महाविद्यालये, खासगी क्लासेस, प्रशिक्षण संस्था, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, नाट्यगृह बंद असून, शासनाचे‌ पुढील आदेश येईपर्यंत ते बंदच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

अनलॉक - 5.0 : हॉटेल्स-बार आजपासून पूर्ववत

राज्य‌ शासनाच्या‌ आदेशानुसार शहरातील हॉटेल, फूड कोर्ट, रेस्टॉरंट बार आधी आजपासून 50 टक्के क्षमतेने सुरू ठेवण्यात येतील, असे नमूद केले आहे. केंद्र, राज्य आणि महापालिका प्रशासनाने वेळोवेळी परवानगी दिलेल्या आस्थापना यापूर्वी दिलेल्या सवलतीनुसार सुरूच राहणार आहेत. तर, प्रतिबंधित क्षेत्रातील सर्व प्रतिबंध व नियम पूर्वीप्रमाणेच 31 ऑक्टोबरपर्यंत लागू राहणार आहेत.

याचबरोबर सार्वजनिक व कामाच्या ठिकाणी सुरक्षेसंबंधीचे नियम पाळणे बंधनकारकच राहणार आहे. मास्क, सामाजिक अंतर, निर्जंतुकीकरण, गर्दी या संदर्भातील नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.

सार्वजनिक सभा, संमेलने यांना बंदी कायम असून, लग्न समारंभासाठी 50 आणि अंत्यविधीसाठी 20 लोकांनाच परवानगी राहणार आहे. शासनाचे पुढील आदेश येईपर्यंत शहरातील शाळा, महाविद्यालये, खासगी क्लासेस, प्रशिक्षण संस्था, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, नाट्यगृह आदी शासनाचे‌ पुढील आदेश येईपर्यंत बंदच राहणार असल्याचे पालिकेने सांगितले आहे.

आजपासून हॉटेल्स बार 50 टक्क्यांनी सुरू झाल्यानंतर अनेकांना दिलासा मिळाला आहे. तसेच पर्यटनासाठी देखील थोडाफार वाव मिळाला असल्याचे चित्र आहे. शहरातील अनेक बार, हॉटेल्समध्ये तयारी पूर्ण झाली असून स्वच्छतेची तयारी पूर्ण झालीय. येणाऱ्या ग्राहकांना मास्क, सॅनिटायझर बंधनकारक करण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.