ETV Bharat / state

शाहूवाडी तालुक्यात 3 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार, आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी - शाहूवाडी बलात्कार घटना

चिमुकलीची प्रकृती बिघडल्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला. स्वतः बलिकेने याबाबत माहिती दिली. घटना उघडकीस आल्यानंतर संबंधित आरोपीला अटक करण्यात आली असून संतापलेल्या गावकऱ्यांनी त्या नराधमाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे.

कोल्हापूर
कोल्हापूर
author img

By

Published : Oct 29, 2020, 8:37 PM IST

Updated : Oct 29, 2020, 10:28 PM IST

कोल्हापूर - शाहूवाडी तालुक्यातील एका गावात 3 वर्षांच्या बालिकेवर 55 वर्षीय नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. यशवंत बापू नलवडे असे संशयित आरोपीचे नाव असून शाहूवाडी पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल झाला आहे. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटनेनंतर गावासह परिसरात तणाव निर्माण झाला असून गावातील नागरिकांनी आज आरोपीला कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी मोर्चा काढला.

शाहूवाडी तालुक्यात 3 वर्षांच्या बलिकेवर अत्याचार, आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी

नराधमाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी

मिळालेल्या माहितीनुसार, आई-वडील आणि आजोबा शेतात गेले असताना चिमुकली दारात खेळत होती. त्यावेळी तिला संशयित आरोपी यशवंत नलवडे याने घरामध्ये बोलवून अत्याचार केले. चिमुकलीची प्रकृती बिघडल्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला. स्वतः बलिकेने याबाबत माहिती दिली. घटना उघडकीस आल्यानंतर संबंधित आरोपीला अटक करण्यात आली असून संतापलेल्या गावकऱ्यांनी त्या नराधमाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे.

आज दिवसभर गावात तणावपूर्ण शांतता असून सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. आरोपीला शिक्षा होत नाही तोपर्यंत याचा पाठपुरावा केला जाणार असून या घटनेकडे लक्ष वेधण्यासाठी दररोज वेगवेगळी आंदोलने केली जाणार असल्याचेसुद्धा गावकऱ्यांनी म्हटले आहे.

Last Updated : Oct 29, 2020, 10:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.