ETV Bharat / state

हुतात्मा जवान संग्राम पाटील यांच्या घराचे अपुरे स्वप्न पूर्ण करू - हसन मुश्रीफ - मंत्री हसन मुश्रीफ हुतात्मा जवान संग्राम पाटील

हुतात्मा जवान संग्राम पाटील यांच्या घराचे अधुरे राहिलेले स्वप्न पूर्ण करू, अशी आदरांजली ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी वाहिली. मंत्री मुश्रीफ यांनी निगवे खालसा गावामध्ये जाऊन अंत्यसंस्कार होणार असलेल्या ठिकाणी भेट दिली व ग्रामस्थांकडे विचारपूस केली.

कोल्हापूर
कोल्हापूर
author img

By

Published : Nov 22, 2020, 10:08 PM IST

कोल्हापूर - कोल्हापुरातील करवीर तालुक्यातील निगवे खालसा गावातील हुतात्मा जवान संग्राम पाटील यांच्या घराचे अधुरे राहिलेले स्वप्न पूर्ण करू, अशी आदरांजली ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी वाहिली. मंत्री मुश्रीफ यांनी निगवे खालसा गावामध्ये जाऊन अंत्यसंस्कार होणार असलेल्या ठिकाणी भेट दिली व ग्रामस्थांकडे विचारपूस केली.

कोल्हापूर

मुश्रीफ यांच्याकडून अंत्यसंस्काराच्या ठिकाणी भेट देऊन तयारीची चौकशी -
मंत्री मुश्रीफ यांनी रविवारी रात्री आठ वाजता गावाला भेट दिल्याची माहिती समजताच ग्रामस्थ मोठ्या संख्येने या मैदानावर जमा झाले व त्यांच्यासमोर मुश्रीफ यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी मंत्री मुश्रीफ म्हणाले, शहीद संग्राम पाटील यांची पार्श्वभूमी शेतकरी कुटुंबाची आहे. त्यांच्या मागे आई- वडील, पत्नी व लहान मुले असा परिवार आहे. या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या दुःखातून सावरण्याची शक्ती आणि हिम्मत परमेश्वराने पाटील कुटुंबीयांना द्यावी, अशी प्रार्थना करतो. या परिवाराच्या पाठीशी हिमालयासारखे उभारणे, ही संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे.
घराचे स्वप्न पूर्ण करेन - मुश्रीफ
कुटुंबीयांच्या व मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी पालकमंत्री सतेज पाटील व आमदार ऋतुराज पाटील स्वीकारतीलच. मात्र माध्यमांमधून वाचले की, शहीद जवान संग्राम पाटील यांचे घर बांधायचे स्वप्न अपुरे राहिले आहे. त्यांचे हे अपुले स्वप्न मी मुश्रीफ फाऊंडेशनच्या माध्यमातून पूर्ण करेन असेही मुश्रीफ यांनी म्हंटले. शिवाय उद्या होणाऱ्या अंत्यसंस्काराला सर्व ग्रामस्थ व नागरिकांनी संयम पाळून अखेरची मानवंदना द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
संग्राम पाटील यांच्या कुटुंबाच्या पाठीशी हिमालयाप्रमाणे राहणे आपलं कर्तव्य -
मंत्री मुश्रीफ म्हणाले, गोरगरीब शेतकरी कुटुंबातील मुले परिस्थितीशी झगडत भारतीय सैन्यदलात भरती होत असतात. भारतमातेच्या संरक्षणासाठी जीवाची बाजी लावून ऊन, वारा, पाऊस आणि शत्रू अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी ते दररोज झगडत असतात. जवान शहीद झाल्यानंतर थोडेच दिवस समाज त्यांना सहानुभूती दाखवतो. काळाच्या ओघात पुढे विसरून जातो व ही कुटुंबे उघड्यावर पडतात. असे होता कामा नये. या कुटुंबियांच्या पाठीशी आपण सदैव हिमालयासारखे राहिले पाहिजे, असेही ते म्हणाले.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.