कोल्हापूर : आज पहाटे कोल्हापूरसह सांगली सातारा जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचे केंद्र सातारा जिल्ह्यातील कोयना धरणापासून अवघ्या वीस किलोमीटर अंतरावर आहे, त्यामुळे नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले. 3.4 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीपासून 5 किमी खाली होता. कोल्हापूरपासून 76 किमी अंतरावर चांदोली अभयारण्य परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले.
नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण : सातारा जिल्ह्यातील कोयना धरण आणि अभयारण्य परिसरात हे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. आज सकाळी पावणे सातच्या सुमारास हे धक्के जाणवल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. जिल्ह्यातील पाटण शहरासह लगतच्या गावांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. पहाटे 6.40 मिनिटांनी भूकंपाचा धक्का बसला. मॉर्निग वाॅकसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांमध्ये त्यामुळे भीतीचे वातावरण पसरले.
भूकंपाचे सौम्य धक्के : कोयना धरणापासून 20 किलोमीटर अंतरावर भूकंप धक्के जाणवले आहेत, धरण सुरक्षित आहे. भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही. कोल्हापूर सातारासह सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील चांदोली अभयारण्य परिसरापासून 15 किमी परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. 3.2 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप सकाळी झाला. सकाळी 6 वाजून 55 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले.
गेल्या महिन्यात सिंधुदुर्गमध्ये भूकंपाचे धक्के : दरम्यान, गेल्या महिन्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातही भूकंपाचे धक्के जाणवले होते. 29 जुलै रोजी सावंतवाडी तालुक्यात भूकंपाचे धक्के जाणवले होते. माडखोल, कलंबिस्त, सरमळे, ओटवणे, कारिवडे, कोनशी, भालावल, ओवळीये, धवडकी, विलवडे आदी गावांमध्ये मोठा आवाज होऊन सौम्य धक्के जाणवले होते. त्यावेळी जमीनही हादरली होती. परंतु या भूकंपामध्ये कोणतेही नुकसान झालेले नाही.
- नंदुरबार जिल्ह्यात देखील भूकंप : फेब्रुवारी महिन्यात देखील असेच भूकंपाचे सौम्य स्वरूपाचे धक्के नंदुरबार जिल्ह्यातील काही भागांमध्ये जाणवले होते. त्या भूकंपाची तीव्रता 2.8 रिश्टर स्केल होती. या अगोदर 2 जानेवारी 2021 रोजी 4.4 रिश्टर स्केलचा, त्यानंतर 24 जानेवारी 3.5 रिश्टर स्केल तसेच 11 ऑगस्ट 2021 रोजी 3.7 रिश्टर स्केलचा भूकंप जाणवला होता.
हेही वाचा :