ETV Bharat / state

मिरज-कोल्हापूर रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण आणि विद्युतीकरण गरजेचे - खा. धनंजय महाडिक यांनी वेधले संसदेचे लक्ष - Dhananjay Mahadik in Parliament

Kolhapur Railway Issue: कोल्हापूरला व्यापारी आणि पर्यटनदृष्ट्या मोठे महत्त्व आहे. (Miraj Kolhapur Railway Line) त्यामुळेच वर्षभर कोल्हापुरात लाखो प्रवासी आणि पर्यटक येतात. अशा वेळी कोल्हापूरला जोडणार्‍या रेल्वे गाड्यांची संख्या वाढवणे आवश्यक आहे. (Double Railing and Electrification of Railway Line) मात्र त्यासाठी मिरज-कोल्हापूर रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण आणि विद्युतीकरण होणे आवश्यक आहे, असे मत राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी संसदेत मांडले.

Kolhapur Railway Issue
खा. धनंजय महाडिक
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 11, 2023, 9:49 PM IST

कोल्हापूर रेल्वेच्या दुपदरीकरणाचे महत्त्व सांगताना खासदार धनंजय महाडिक

कोल्हापूर Kolhapur Railway Issue : कोल्हापूरला कला-क्रीडा-संस्कृती-इतिहास यांचा मोठा वारसा असून, औद्योगिकदृष्ट्यासुध्दा कोल्हापूर महत्त्वाचे शहर आहे. अशा वेळी मिरज-कोल्हापूर रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण आणि विद्युतीकरण झाल्यास कोल्हापूरची कनेक्टिव्हिटी वाढणार आहे. यासाठी केंद्र सरकारने कोल्हापूरला विशेष पॅकेज द्यावे अशी मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी सभागृहात केली. (Dhananjay Mahadik in Parliament) नवी दिल्लीत संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून खासदार धनंजय महाडिक यांनी सभागृहात अनेक विषय आणि मुद्दे राज्यसभेत मांडले. मिरज-कोल्हापूर रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण आणि विद्युतीकरण करणे का आवश्यक आहे, याबद्दल सविस्तर माहिती त्यांनी सभागृहाला दिली. (Development of Kolhapur Railway)

औद्योगिक, पर्यटनदृष्ट्या कोल्हापूर प्रमुख केंद्र : कोल्हापूर दक्षिण महाराष्ट्रातील एक प्रमुख शहर असून पर्यटन आणि कृषी, व्यापार, उद्योग क्षेत्रातील आघाडीचा जिल्हा आहे. त्यामुळे दरवर्षी लाखो भाविक, पर्यटक आणि उद्योजक कोल्हापुरात येतात. मात्र, मिरज ते कोल्हापूर रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण आणि विद्युतीकरण रखडले असल्याचे, खासदार महाडिक यांनी सांगितले. वंदे भारत एक्सप्रेससह नव्या रेल्वे गाड्या सुरू करण्यासाठी मिरज-कोल्हापूर रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण आणि विद्युतीकरण लवकर होणे गरजेचे आहे. जिल्ह्यात ऊस आणि गुळाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. शिवाय फाऊंड्री, कापड उद्योग यातूनही मोठी उलाढाल होते. नजीकच्या काळात कोल्हापूर रेल्वे स्थानक कोकण रेल्वेला जोडले जाणार आहे. अशा वेळी मिरज-कोल्हापूर या ४७ किलोमीटरच्या मार्गाचे दुपदरीकरण आणि विद्युतीकरण अत्यंत आवश्यक असल्याचे खासदार महाडिक यांनी राज्यसभेत बोलताना स्पष्ट केले.

रेल्वेच्या समस्येत दिवसेंदिवस वाढ : कोल्हापूर हे कर्नाटक आणि कोकण जोडणारा दुवा आहे. यामुळे या ठिकाणी व्यापार मोठ्या प्रमाणात चालतो. साखरपट्टा असल्याने शेतीतून मिळणारी उत्पादने ग्राहकांपर्यंत पोहोचावी यासाठी छत्रपती राजाराम महाराज यांच्या संकल्पनेतून स्वातंत्र्यापूर्वी कोल्हापूर रेल्वे स्थानकाची स्थापना केली गेली; मात्र रेल्वे विभागाने ग्राहकांच्या समस्यांकडे पाठ फिरवल्याचे चित्र पाहायला मिळते. कोल्हापूर-मिरज, कोल्हापूर-पुणे, कोल्हापूर-मुंबई मार्गावर धावणाऱ्या अनेक रेल्वे गाड्या सध्या बंद स्थितीत आहेत. बंद झालेल्या रेल्वे गाड्या सुरू झाल्यास कोल्हापूरच्या कनेक्टिव्हिटीला फायदा होणार आहे.

हेही वाचा:

  1. 'मोदी गॅरंटी आहे', लवकरच अखंड हिंदुस्थानचं स्वप्न देखील पूर्ण होईल - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
  2. उच्चशिक्षित हिंदुत्ववादी गडगंज संपत्तीचे मालक, कोण आहेत मध्य प्रदेशचे होणारे मुख्यमंत्री मोहन यादव
  3. "हिंमत असेल तर अजित पवारांना मुख्यमंत्री करा, ठाकरे गटाकडून मी ठराव मांडतो", भास्कर जाधवांचं सभागृहात आव्हान

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.