कोल्हापूर - ठाकरे सरकारच्या मंत्रीमंडळाचा विस्तार ३० डिसेंबर २०१९ ला झाला. काँग्रेस, राष्ट्रवादीसह शिवसेनेने बऱ्याच ज्येष्ठ आमदारांचा पत्ता कट केला आहे. मंत्रीपद न मिळाल्याने अनेक आमदार नाराज असल्याचे पाहायला मिळते आहे. काँग्रेस प्रदेशचे उपाध्यक्ष आणि कोल्हापूरचे आमदार पी एन पाटील हेही नाराज आहेत. ते पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा देण्याची शक्यता वर्तवली जातेय.
मंत्रीपद न मिळाल्याने कार्यकर्त्यांनी पी एन पाटील यांच्यावर दबाव आणला आहे. त्यामुळे ते राजीनामा देणार असल्याची माहिती मिळते आहे. त्यांच्या समर्थकांनी घेतलेल्या मेळाव्यात सामुदायिक राजीनामा देण्याचा ठराव मंजूर झाला आहे. त्यामुळे पी एन पाटील काय निर्णय घेणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.