ETV Bharat / state

महानगरपालिकेने केलेल्या उपाययोजनांमुळे कोल्हापुरातून पाणी टंचाई गायब - Kolhapur water supply news

गेल्यावर्षी एप्रिल आणि मे महिन्यात मोठ्या प्रमाणात नागरिकांना पाण्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागला होता. मात्र, यावर्षी मुबलक पाणीसाठा असल्याने पाण्याची अद्याप कोठेही टंचाई जाणवलेली नाही. महानगरपालिकेने कोल्हापूर शहरात पाणी पुरवठ्याबाबत चारही वॉर्डमध्ये अधिकारी नेमले आहेत.

water supply
पाणीपुरवठा
author img

By

Published : May 27, 2020, 4:36 PM IST

कोल्हापूर - गतवर्षी कोल्हापूर शहरात मोठ्या प्रमाणात पाण्याचे प्रश्न निर्माण झाले होते. मात्र, यावर्षी कोल्हापूर शहरात पाणी पुरवठ्याबाबत चारही वॉर्डमध्ये अधिकारी नेमण्यात आले आहेत. कोणालाही पाणी टंचाईचा सामना करावा लागणार नाही, याची काळजी घेण्यात आली आहे.

शहरात महानगरपालिकेचे एकूण 13 टँकर आहेत. पालिकेने इतर संस्थांकडून 40 टँकर घेतले आहेत. मात्र, जिल्ह्यात अद्याप मुबलक पाणीसाठा असल्याने टँकरद्वारे पाणी पुरवण्याची गरज निर्माण झाली नाही. जेव्हा टंचाई भासेल तेव्हा सुद्धा टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याऐवजी शहरात जे 530 बोअर आहेत, त्यांच्यामार्फत पाणीपुरवठा करण्यावर भर दिला जाणार आहे. 'ईटीव्ही भारत'शी बोलताना महापौर निलोफर आजरेकर यांनी याबाबत माहिती दिली.

शहरातील एकूण 530 बोअरचे सध्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्या बोअरच्या ठिकाणी पाण्याच्या टाक्या बसवण्यात आल्या आहेत. त्याचा वापर पाणी टंचाईच्या वेळी करण्यात येणार आहे. त्यामुळे दरवर्षी ज्याप्रकारे शहराला पाण्याची टंचाई भासते त्या तुलनेत यावर्षी नागरिकांना टंचाईचा सामना करावा लागणार नाही, असेही महापौर म्हणाल्या.

महानगरपालिकेने केलेल्या उपाययोजनांमुळे कोल्हापूरातून पाणी टंचाई गायब

व्यावसायिक वापरकर्त्यांकडून पाण्याची मागणी झाली कमी -

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिक वापरकर्त्यांचा पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. त्यामुळे मागणीसुद्धा कमी झाली आहे. शहरात मोठ्या संख्येने हॉटेल व्यावसायिक आहेत. लॉकडाऊनमुळे सर्व काही ठप्प झाले आहे. परिणामी पाण्याचा वापर सुद्धा कमी झाला आहे. मात्र, घरगुती पाणी वापरतात कमालीची वाढ झाल्याचे चित्र पहायला मिळते आहे.

महानगरपालिकेचे टँकर आणि उपाययोजना -

शहरात महामगरपालिकेचे एकूण 13 टँकर आहेत. तर जवळपास 40 खासगी टँकर इतर संस्थांकडून घेण्यात आले आहेत. असे 53 टँकर शहरात आहेत. गेल्यावर्षी एप्रिल आणि मे महिन्यात मोठ्या प्रमाणात नागरिकांना पाण्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागला होता. मात्र, यावर्षी मुबलक पाणीसाठा असल्याने पाण्याची अद्याप कोठेही टंचाई जाणवलेली नाही. ज्या ठिकाणी अगदीच मोठी अडचण आहे, त्याठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, असे क्वचितच होत असल्याचे महानगरपालिकेचे आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी यांनी सांगतले.

पाणीपुरवठा समस्येसाठी पालिकेकडून हेल्पलाईन नंबर -

पाणीपुरवठ्याबाबत कोणत्याही तक्रारी किंवा अडचणी असतील तर नागरिकांनी 9766532010 आणि 9766532016 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन सुद्धा आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.