ETV Bharat / state

पराभवाला घाबरूनच 'गोकुळ'चे सत्ताधारी सर्वोच्च न्यायालयात - सतेज पाटील - गोकुळ दुध संघ

गोकुळच्या निवडणुकीत पराभवाला घाबरूनच सत्ताधारी सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत, असा घणाघात पालकमंत्री सतेज पाटील यांनी केला आहे.

satej patil on gokul election
satej patil on gokul election
author img

By

Published : Mar 22, 2021, 4:37 PM IST

Updated : Mar 22, 2021, 4:44 PM IST

कोल्हापूर - गोकुळच्या निवडणुकीत पराभवाला घाबरूनच सत्ताधारी सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत, असा घणाघात पालकमंत्री सतेज पाटील यांनी केला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गोकुळची पंचवार्षिक निवडणूक पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी सत्ताधारी गटाने न्यायालयात केली आहे. त्यावर ते कोल्हापुरात बोलत होते.

गोकुळची पंचवार्षिक निवडणूक पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी गोकुळ संघातील सत्ताधार्‍यांनी उच्च न्यायालयात केली होती. मात्र ही मागणी फेटाळून लावत उच्च न्यायालयाने निवडणूक घेण्याचे आदेश दिले होते. मात्र कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता ही निवडणूक पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी करत गोकुळ दूध संघातील सत्ताधाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यावर राजर्षी शाहू आघाडीचे नेते व पालकमंत्री सतेज पाटील यांनी गोकुळ संघातील सत्ताधाऱ्यांवर चांगलाच निशाणा साधला आहे. गोकुळची पंचवार्षिक निवडणूक घ्यावी, असे आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. मात्र सत्ताधारी गटाने ही निवडणूक होऊ नये यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सत्तारूढ गटाला परिस्थिती अशीच राहू दे असे वाटते. जेणेकरून गोकुळमधून आणखीन दूध काढता यावे, असा त्यांचा प्रयत्न आहे, असा टोला सतेज पाटील यांनी लगावला.

पत्रकारांशी बोलताना काँग्रेस नेते सतेज पाटील

हे ही वाचा - दोन दिवसांपासून अवकाळी पाऊस अन् गारपीट सुरू; 4 हजार 880 हेक्टरवरील पिकांचे नुकसान

कर नाही त्याला डर कशाला, सत्तारूढ गटाने निवडणुकीला सामोरे गेले पाहिजे. गोकुळच्या निवडणुकीत काय परिणाम होणार आहे. हे सत्तारूढ गटाला समजले आहे. त्यामुळेच त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. पराभवाला घाबरूनच सत्ताधारी न्यायालयात गेले असल्याचा टोला पालकमंत्री सतेज पाटील यांनी लगावला आहे.

Last Updated : Mar 22, 2021, 4:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.