ETV Bharat / state

Kolhapur Flood : संभाव्य पूरस्थितीला तोंड देण्यासाठी कोल्हापूर आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज - Disaster Management System Kolhapur

कोल्हापूर जिल्ह्यात 2019 ते 2021 साली आलेल्या महापुराचा विचार करून यंदाही जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज झाली आहे. शासन-प्रशासन, स्वयंसेवी-सेवाभावी संस्था आणि कोल्हापूरकरांच्या धैर्य आणि संयमी वृत्तीमुळे महापूरातूनही कोल्हापुरकर सावरले. पण महापुरामुळे जिल्ह्याची फार मोठी हानी झाली होती.

Kolhapur Flood
Kolhapur Flood
author img

By

Published : May 21, 2023, 5:40 PM IST

कोल्हापूर आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज

कोल्हापूर : गेल्या दोन मोठ्या महापुराच्या अनुभवावरून आणि यंदाच्या पावसाळ्यात संभाव्य महापुराची शक्यता गृहीत धरुन प्रशासनाने आतापासूनच नियोजन केले आहे. पूरस्थितीचा मुकाबला करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज केली आहे. 2019 आणि 2021 सालाच्या महापुराचे कटू अनुभव डोळयासमोर ठेऊन जिल्हा प्रशासनाने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सज्ज आणि सतर्क केली आहे. महापुराचा सामना करताना कोणतीही कमी राहू नये यासाठी प्रशासनाने सामग्री अद्ययावत केली आहे.

प्रत्येक तालुक्यात बोटिंची व्यवस्था : पूर बाधित गांवात पूरनियंत्रणाच्या उपाययोजनांचे सुक्ष्म नियोजन केले आहे. महापुराचा अनुभव लक्षात घेऊन पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हयातील प्रत्येक तालुक्यात बोटिंची व्यवस्था करण्यात येत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक 80 बोट असून राज्यातील सर्वाधिक सक्षम आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा कोल्हापूरात आहे. गरज पडल्यास एनडीआरएफची पथके बोटिंसह मागणी करण्यात येणार आहे. शिवाय भारतीय तटरक्षक दलही बचाव, मदत कार्यासाठी सक्रीय होईल. जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या माध्यमातून संभाव्य पूरपरिस्थितीला तोंड देण्यासाठी आवश्यक साधनसामुग्री सुद्धा उपलब्ध करण्यात आली असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांनी माहिती दिली.

महापुरामुळे बाधित होणारी जिल्ह्यातील एकूण गावे : महापुरामुळे कोल्हापूर जिल्हयातील 386 गावे समाविष्ट आहेत. त्यामध्ये कोल्हापूर शहर शिरोळ तालुक्यातील 42, हातकणंगले -23, करवीर-57, कागल-41, राधानगरी -22, गगनबावडा-19, पन्हाळा-47, शाहुवाडी-25, गडहिंग्लज -27, चंदगड-30, आजरा-30, भुदरगड तालुकयातील -23 अशी संख्या तालुकावर जिल्ह्यातील पुरबाधित गावांची आहे. या पूरबाधित गांवामध्ये पूरनियंत्रणाच्या दृष्टीने शोध, बचाव पथके गठीत केली. गाव ते जिल्हा पातळीवर प्रशासकीय यंत्रणा सतर्क ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

संभाव्य पूरपरिस्थितीला तोंड देण्यासाठी उपलब्ध साधनसामुग्री : रबर बोट जुन्या, नव्या मिळून 70 ते 80, एअर पंप फॉर बोट- 6, टॉर्च सर्च लाईट- 40, लाईफ बाईज- 70 ते 80, सेफ्टी हेलमेट-50, मेगा फोन-21, लाईफ जॅकेट -1000, लाईफ बॉय रिंग- जवळपास 500, अंडर वॉटर सर्च लाईत-10, आस्का लाईट-18 या साधनसामग्रीसह सुमारे 800 हून अधिक प्रशिक्षित स्वयंसेवकांची फौजही जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे सज्ज आहे.

पूरपरिस्थिती उद्भवल्यास यंत्रणा सज्ज : संभाव्य महापुराला तोंड देण्यासाठी उपलब्ध करुन दिलेली साधनसामुग्री योग्य सुस्थितीत आहे. किंवा नाहीत याची खातरजमा करण्यात येणार आहे. शिवाय त्याची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. तालुका पातळीवरील सर्वच तहसीलदारांना आता तशा सूचना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे यंदाही जर कोल्हापूर जिल्ह्याला महापुराच्या संकटाला सामोरे जावे लागले तर जिल्हा प्रशासन मात्र सज्ज असणार आहे.

हेही वाचा -

  1. CM Shinde in Clean-Up Drive: नागरिकांनो! पर्यावरण आणि स्वच्छतेसाठी दररोज एक मिनीट वेळ द्या, मुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
  2. Sameer Wankhede CBI Inquiry : दुसऱ्या दिवशीही समीन वानखेडेंची सीबीआय चौकशी; प्रश्नांचा केला भडीमार
  3. PM Modi Jacket : मोदींच्या 'या' जॅकेटची जगभरात चर्चा, वाचा काय आहे खास..

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.