कोल्हापूर- कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने कोरोनावर बऱ्याच प्रमाणात नियंत्रण मिळवले आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली होती. दररोज 500 हुन अधिक रुग्णांची वाढ होत होती शिवाय मृत्युंची संख्याही त्याच वेगाने वाढत चालली होती. गेल्या महिन्याभरात जवळपास तीन हजार नवीन रुग्ण आढळले आहेत. तर, तब्बल 11 हजार रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
कोरोना मृत्युंची संख्याही काही प्रमाणात कमी झाली असून 1 ऑक्टोबरपासून आजपर्यंत 189 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. सप्टेंबर महिन्याचा विचार केला तर 20 हजार 632 नवीन रुग्ण आढळले होते तर तितक्याच रुग्णांना म्हणजेच 19 हजार 015 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक म्हणजे तब्बल 718 जणांचा एका महिन्यात मृत्यू झाला होता. सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस 8 हजार 30 ऍक्टिव्ह रुग्ण होते तर ऑक्टोबर महिन्यात तीच संख्या आता 1 हजार 160 इतकी झाली आहे. एकूणच आकडेवारीवर नजर टाकल्यास कोल्हापूरातील कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचे चित्र असून, लवकरच कोल्हापूर कोरोनामुक्त होईल अशी आशा व्यक्त केली जाते आहे.
आज तालुका, नगरपालिका आणि महानगरपालिका क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे :
आजरा- 838
भुदरगड- 1,193
चंदगड- 1,195
गडहिंग्लज- 1,379
गगनबावडा- 140
हातकणंगले- 5,193
कागल- 1,622
करवीर- 5,504
पन्हाळा- 1,829
राधानगरी- 1,211
शाहूवाडी- 1,281
शिरोळ- 2,440
नगरपरिषद क्षेत्र- 7,304
कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 14,498
इतर जिल्हा व राज्यातील 2190 असे मिळून आत्तापर्यंत एकूण 47 हजार 777 रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. जिल्ह्यातील एकूण 47 हजार 777 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 44 हजार 987 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर एकूण 1,630 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 1,160 इतकी आहे.
वयोगटानुसार एकूण रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे :
1 वर्षांपेक्षा लहान - 55 रुग्ण
1 ते 10 वर्ष - 1,844 रुग्ण
11 ते 20 वर्ष - 3,359 रुग्ण
21 ते 50 वर्ष - 25,399 रुग्ण
51 ते 70 वर्ष - 13,686 रुग्ण
71 वर्षांपेक्षा जास्त - 3,434 रुग्ण
एकूण 1,630 मृत रुग्ण पुढीलप्रमाणे :
इचलकरंजी - 226 मृत्यू
कोल्हापूर शहर - 358 रुग्णांचा मृत्यू
हातकणंगले - 210 रुग्णांचा मृत्यू
गडहिंग्लज - 36+15 रुग्णांचा मृत्यू
करवीर - 172 रुग्णांचा मृत्यू
आजरा - 30 रुग्णांचा मृत्यू
शिरोळ - 95+20 जणांचा मृत्यू
जयसिंगपूर - 20 रुग्णांचा मृत्यू
शाहूवाडी - 38 रुग्णाचा मृत्यू
पन्हाळा - 65 रुग्णांचा मृत्यू
चंदगड - 29 रुग्णांचा मृत्यू
भुदरगड - 40 रुग्णाचा मृत्यू
हुपरी - 20 रुग्णांचा मृत्यू
कुरुंदवाड - 6 रुग्णांचा मृत्य
कागल - 26 रुग्णांचा मृत्य
गगनबावडा - 4 रुग्णांचा मृत्यू
मुरगुड - 4 रुग्णांचा मृत्यू
पेठवडगाव - 2 रुग्णांचा मृत्यू