कोल्हापूर - कोल्हापूरचा टोल आम्ही घालवला, असे चंद्रकांत पाटील म्हणत आहेत. मात्र, हा टोल येथील जनतेने घालवला आहे. जर ते असे म्हणत असतील तर त्यासारखा कपाळकरंटी माणूस कोणी नसेल, अशा तीव्र शब्दात कोल्हापुरातील नागरिकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. जिल्ह्यात युतीला मिळालेल्या अपयशानंतर आयोजित पत्रकार परिषदेत रविवारी चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरातील जनतेला आमचे काय चुकले, असा सवाल केला होता. त्यावर नागरिकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
हेही वाचा - शिवसेना नेते दिवाकर रावतेंनी घेतली राज्यपालांची भेट
शिवाय जिल्ह्यात अनेक प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत. त्याकडे युतीच्या सरकारने दुर्लक्ष केले आहे. अनेक तरुण बेरोजगार आहेत. विशेष म्हणजे 2 महिन्यांपूर्वी शहरावर महापुराचे भीषण संकट ओढवले होते. या काळात राज्याचे महसूलमंत्री या नात्याने आपण कोल्हापुरातील जनतेचे संसार पुन्हा नव्याने उभारण्यासाठी मदत करायला हवी होती. पूरग्रस्तांना सानुग्रह अनुदानातील 5 हजार रुपये यावेळी शासनाकडून देण्यात आले होते. मात्र, इतके पैसे दिले म्हणजे सर्व झाले असे होत नाही, अशी प्रतिक्रियाही नागरिकांनी व्यक्त केली.