ETV Bharat / state

Hasan Mushrif Vs Samarjit Singh Ghatge : हसन मुश्रीफ यांच्या सारखा पाठीत खंजीर खुपसत नाही : समरजीतसिंह घाटगे - District President Samarjitsinh Ghatge

जे काही करायचं आहे ते मी छातीठोकपणे समोर जाऊन करतो, मी समोरून वार करतो हसन मुश्रीफ यांच्यासारखं पाठीत खंजीर खुपसत नाही. हसन मुश्रीफ साहेब तुमचे काळीज वाघाचे असेल, तुमच्यात पुरुषार्थ असेल तर, जातीच्या मागे का लपता, अशा शब्दात भाजप जिल्हाध्यक्ष समरजीत सिंह घाटगे यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

Hasan Mushrif Vs Samarjit Singh Ghatge
Hasan Mushrif Vs Samarjit Singh Ghatge
author img

By

Published : Jan 15, 2023, 3:56 PM IST

हसन मुश्रीफ यांच्या सारखा पाठीत खंजीर खुपसत नाही : समरजीतसिंह घाटगे

कोल्हापूर - भाजप जिल्हाध्यक्ष समरजीत सिंह घाटगे यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर जोरदार टीका केली आहे. शिवाय हसन मुश्रीफ जातीयवादी आहे असे देखील ते म्हणाले. गाटगे कोल्हापूरातील पत्रकार परिषदेत बोलत होते. दोन दिवसांपूर्वी हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीची कारवाई झाली. यावेळी हसन मुश्रीफ यांनी या कारवाईमागे समरजीतसिंह घाटगे असल्याची शंका व्यक्त केली होती. यानंतर आज घाटगे यांनी पत्रकार परिषद घेत मुश्रीफ प्रतिउत्तर दिले आहे.

पाठीत खंजीर खुपसत नाही - जे काही करायेच आहे ते मी छातीठोकपणे करतो तुमच्यासारखा पाठित खंजिर खुपसत नाही. तुम्ही मर्द असाल तर कारवाईला घाबरता कशाला, अशा प्रहार घाडगे यांनी केला. दोन दिवसापूर्वी माझी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीची धाड पडली. यावेळी हसन मुश्रीफ हे कामानिमित्त बाहेरगावी होते. तर, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले होते. यावेळी हसन मुश्रीफ यांनी सोशल मीडिया च्या माध्यमातून कार्यकर्त्यांना शांततेचा आवाहन केलं होत.

कागल मधील भाजप नेत्याचा हात - यामागे कागल मधील भाजप नेत्याचा हात असून त्यांच्या दिल्लीवाऱ्या चालू आहेत असे, म्हणत नाव न घेता भाजप जिल्हाध्यक्ष समरजीत सिंह घाटगे यांच्यावर टीका केली होती. याला आता समरजीतसिंह घाटगे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिल असून हसन मुश्रीफ यांच्यावर पडलेल्या धाडीची माहिती मला माध्यमांमधून समजली. यावेळी मी माझ्या वेगळ्या कामानिमित्त दिल्लीमध्ये होतो. याबाबत मला काहीही माहित नव्हतं.

नवाब मलिक यांचा पुळका - तरीही हसन मुश्रीफांनी नेहमीप्रमाणे ठरलेली स्क्रिप्ट वाचायची, तेच आरोप माझ्यावर करायचे. हसन मुश्रीफ हे स्वतःला नवाब मलिक यांच्या पंगतीत बसवून घेतले आहेत. नवाब मलिक यांच्यावर वेगळे आरोप आहेत, यांच्यावर वेगळे आरोप आहेत. नवीन वर्षाच्या सुरुवातीला किरीट सोमय्या यांनी अनेक नेत्यांची नाव आपल्या ट्विटमध्ये घेतली आहेत. मात्र मुश्रीफ यांना केवळ नवाब मलिक यांचा पुळका का येतोय. नवाब मलिक आणि त्यांचे जवळचे काही संबंध आहेत का? असा सवाल ही त्यांनी यावेळी विचारला आहे.

स्वप्नात देखील समरजित घाटगे - हसन मुश्रीफ यांना झोपताना स्वप्नात देखील समरजित घाटगे, त्यांचे कार्यकर्ते दिसत आहेत. मात्र माझं कागदपत्र गोळा करण्याचे काम सुरू आहेत. मुश्रीफ यांना माझ्यावर थेट आरोप करण्याची संधी त्यांना दिली जाईल. मला किरीट सोमय्या यांच्या मागे लपण्याची गरज नाही. मला जे करायचं असेल तर, समोर येऊन करेन माझ्यावर बालिश आरोप करून मुश्रीफ साहेब स्वतःचं हसं करून का घेत आहेत असे, ते यावेळी म्हणाले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.