कोल्हापूर- जोतिबाच्या नावानं चांगभलं, अशी भक्तांच्या गर्द हाकेने दरवर्षी रत्नागिरीचा डोंगर दुमदुमून जातो. मात्र, यंदा पहिल्यांदाच जोतिबाचा पहिला खेटा भक्तांविना पार पडला. कोरोनामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी जोतिबाच्या उत्सवावर बंदी घातल्यानंतर हे चित्र पाहायला मिळाले. तसेच मंदिर परिसरात गर्दी होऊ नये, यासाठी डोंगर पायथ्याला पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
कोल्हापूर; भक्तांविना पार पडला जोतिबाचा पहिला खेटा
कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे श्री जोतिबा खेटेचे आयोजन करण्यात येऊ नये, असे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले होते. जरी आयोजन करण्यात आले तरी मर्यादित लोकांच्याच उपस्थितीत हे खेटे पार पाडण्यात यावेत, अशा सूचनाही देण्यात आल्या होत्या.
जोतिबा मंदिर
कोल्हापूर- जोतिबाच्या नावानं चांगभलं, अशी भक्तांच्या गर्द हाकेने दरवर्षी रत्नागिरीचा डोंगर दुमदुमून जातो. मात्र, यंदा पहिल्यांदाच जोतिबाचा पहिला खेटा भक्तांविना पार पडला. कोरोनामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी जोतिबाच्या उत्सवावर बंदी घातल्यानंतर हे चित्र पाहायला मिळाले. तसेच मंदिर परिसरात गर्दी होऊ नये, यासाठी डोंगर पायथ्याला पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
Last Updated : Feb 28, 2021, 2:16 PM IST