ETV Bharat / state

Jignesh Mevani : महाराष्ट्र, कर्नाटक, मध्यप्रदेशमध्ये भाजपचे सरकार; मग सीमावाद का सूटत नाही? - जिग्नेश मेवाणी - Jignesh Mevani Criticizes BJP On border issue

सीमा प्रश्नावर जिग्नेश मेवाणी यांची भाजपवर टीका केली ( Jignesh Mevani Criticizes BJP ) आहे. त्यांनी कोल्हापूरमघ्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधी स्मारकचे दर्शन घेतले. यावेळी सरकार लोकांना भरकटवण्याचा प्रयत्न करत असल्याचे सुद्धा त्यांनी यावेळी म्हटले.

jignesh mevani
जिग्नेश मेवाणी
author img

By

Published : Dec 24, 2022, 1:36 PM IST

Updated : Dec 24, 2022, 4:04 PM IST

जिग्नेश मेवाणी

कोल्हापूर : एकीकडे पंतप्रधान मोदी, अमित शहा आणि फडणवीस बोलतात आमचे डबल इंजिन सरकार आहे. पण प्रत्यक्षात महाराष्ट्र कर्नाटक आणि मध्यप्रदेश मध्ये सुद्धा आपले सरकार आहे एव्हढेच काय तर आपले केंद्रात सुद्धा सरकार ( Jignesh Mevani Criticizes BJP ) आहे. असे असताना आपल्याला सीमावादाचा प्रश्न सकारात्मक पद्धतीने का सोडवता येत नाही असा सवाल गुजरातचे काँग्रेस नेते आमदार जिग्नेश मेवाणी यांनी केला ( Jignesh Mevani Criticizes BJP On border issue ) आहे.

समाधी स्मारकचे दर्शन : हे सरकार केवळ लोकांना भरकटवण्याचा प्रयत्न करत असल्याचे सुद्धा त्यांनी यावेळी म्हंटले. आज मेवाणी यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधी स्मारकचे दर्शन ( Visit Rajarshi Shahu Maharaj Samadhi Smarak ) घेतले. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी काँग्रेस शहराध्यक्ष सचिन चव्हाण, महादेव नरके आदी उपस्थित होते.

महापुरुषांना अपमान थांबला पाहिजे : यावेळी जिग्नेश मेवाणी म्हणाले, महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून भाजपकडून छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच इतर महापुरुषांचा अवमान करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र मी गुजरात वरून कोल्हापूरात आलो आहे. इथे शाहू जहाराजांच्या जन्मस्थळाला भेट दिली तसेच आता समाधी स्मारकाला भेट दिली. महाराष्ट्रातील आणि कोल्हापूरातील लोकं आजही राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांवर चालत आहे ही खूपच कौतुकास्पद बाब आहे असेही ते म्हणाले. सीमावादावर सुद्धा बोलताना ते म्हणाले की भाजपच्या मनात असेल तर खरंच प्रत्यक्षात हा वाद मिटवू शकतात. कारण त्यांची दोन्ही राज्यांसह केंद्रात सत्ता आहे. मात्र त्यांना हा वादच मिटवायचा नाहीये असेही ते म्हणाले.

Last Updated : Dec 24, 2022, 4:04 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.