कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोना प्रतिबंधात्मक उपयोजना तसेच लसीकरणा संदर्भात पालकमंत्री सतेज पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे आढावा बैठक घेतली. यावेळी कोल्हापूर मेडीकल असोशिएशनच्या पदाधिकाऱ्यांशी पाटील यांनी विविध विषयांवर चर्चाही केली. या बैठकीला आमदार जयंत आसगावकर, जिल्हाधिकारी दौलत देसाई आदी उपस्थित होते.
पालकमंत्र्यांनी केलेल्या सूचनांवर एक नजर
1) कोल्हापूरातील राधानगरी, मुरगूड, मलकापूर, कोडोली, सी.पी.आर. रुग्णालय, आय.जी.एम. रुग्णालय या ठिकाणी ऑक्सिजन जनरेटर तसेच गडहिंग्लजमधील उपजिल्हा रूग्णालय येथे रिफीलिंग प्रकल्प बसविण्यात येणार आहे. या ठिकाणी विद्युत जनरेटर बसवावेत, त्याचबरोबर त्या ठिकाणी असणाऱ्या ट्रान्सफॉर्मरची क्षमता तपासून आवश्यकतेप्रमाणे ते बदलावेत आशा सूचना सुद्धा पालकमंत्री सतेज पाटील यांनी यावेळी संबंधितांना केल्या.
2) कोल्हापूर मेडीकल असोशिएशनच्या पदाधिकाऱ्यांना मागील वर्षाप्रमाणेच याहीवर्षी नियंत्रण कक्षासाठी सेवा देण्यासाठी तीन सत्रात नियोजन करण्यास सांगण्यात आले.
3) शहरातील कोविड रूग्णालयात गरजूंना बेड उपलब्ध करून देण्यासाठी वैद्यकीय भरारी पथकामार्फत रूग्णालयाला भेट देऊन व्यवस्थापनाचे समुपदेशन करण्यात येणार आहे. ज्याला बेडची गरज नाही, अशा रूग्णांना हॉटेलमध्ये व्यवस्था करून रूग्णालयामार्फत उपचार करण्यात येतील.
यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय सोनवणे, कोल्हापूर मेडिकल असोशिएशनच्या अध्यक्ष डॉ. आशा जाधव, उपाध्यक्ष डॉ. गीता पिल्लई, सचिव डॉ. किरण दोशी, सल्लागार डॉ. रवींद्र शिंदे, डॉ. नीता नरके, डॉ. राजेंद्र वायचळ, डॉ. अमर आडके, डॉ. शीतल देसाई, डॉ. शीतल पाटील, डॉ. मुकुंद मोकाशी सुद्धा उपस्थित होते.
कोल्हापुरातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांची महत्वपूर्ण बैठक - satej patil corona news
कोल्हापूर शहरातील कोविड रूग्णालयात गरजूंना बेड उपलब्ध करून देण्यासाठी वैद्यकीय भरारी पथकामार्फत रूग्णालयाला भेट देऊन व्यवस्थापनाचे समुपदेशन करण्यात येणार आहे. ज्याला बेडची गरज नाही, अशा रूग्णांना हॉटेलमध्ये व्यवस्था करून रूग्णालयामार्फत उपचार करण्यात येतील.