कोल्हापूर- जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील होणेवाडी गावात सकारात्मक विचार रूढ झालेत. गेल्या अनेक वर्षांपासून आदर्श गाव ठरवत गावातील तरुणांनी गेली २५ वर्षे निवडणूक बिननविरोध केली आहे.
गाव म्हंटले की भाउबंदकी व राजकिय इर्ष्या आली. राजकारणापाई अनेकांची डोकी फुटतात. तरुणांचा हकनाक बळी जातो. मात्र, कोल्हापूर जिल्ह्यातील एक गाव असे आहे, या गावातील युवकामध्ये राजकिय इर्षा दिसून येत नाही. आजरा तालुक्यातील होणेवाडी असे या गावाचे नाव आहे. आदर्शग्राम संकल्पना रुढ झाल्यानंतर आजरा तालूक्यात यांच गावाने पहिला आदर्श गाव होण्याचा मान मिळविला होता. विशेष बाब म्हणजे गेली २५ वर्षे या गावची ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होत आहे. जेष्ठ व युवकांच्या समन्वयातून आपले हेवेदावे बाजूला ठेवत गावाच्या विकासासाठी सर्वजण एकत्र आले आहेत. सर्वानी एकत्र येत गावाच्या विकासांचे गुण असणारे सात सदस्याची निवड केली. आपली ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याची परपंरा कायम ठेवली आहे.
या गावचा सर्वस्तरावर वरील तालूक्यातील मंडळीनी आर्दश घेणे महत्वाचे आहे. या गावात तब्बल एक दोन वर्ष नव्हेतर २५ वर्षे गावातील ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होत आहे. या पूर्वी झालेल्या बिनविरोध निवडणुकीचा वारसा गावातील युवकांनी पुढे चालवला आहे.